Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi

2 अशुभ योग : 5 राशींसाठी ठीक नाही शनिवार, वाचा तुमच्यासाठी कसा राहील

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 10, 2017, 07:14 AM IST

शनिवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे गद आणि शनी-चंद्राच्या जोडीमुळे विष योग जुळून येत आहे. यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा ठरू शकतो.

 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  शनिवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे गद आणि शनी-चंद्राच्या जोडीमुळे विष योग जुळून येत आहे. यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये काही लोकांचा ताण वाढू शकतो. वाद होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....

 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  मेष - आज तुमचा कार्यउत्साह कमीच असेल. काही पूर्वनियोजित कामे अचानक रद्द होण्याची शक्यता. नोकरीत वरीष्ठांच्या हो ला हो करणेच हिताचे. शुभ रंग : पिवळा, अंक-3.
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  वृषभ - उद्योग व्यवसायात वाढत्या जबाबदाऱ्या त्रासदायक होतील. आज दगदग कमी करा. कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका. उपासना वाढवा. शुभ रंग : मोरपंखी, अंक- 7.
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  मिथुन - आज कोणत्याही स्पर्धा व चढाओढीत अटीतटीची झुंज राहील. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी कार्यसाधक होतील. संध्याकाळी फक्त जोडीदारास वेळ द्या. शुभ रंग : आकाशी, अंक-५.
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  कर्क - अनावश्यक खर्चात कपात करणे गरजेचे आहे. तब्येत थोडी नरमच असेल. काही येणी असली तर वसूल होतील. वादविवाद थोडक्यात आवरा. शुभ रंग : गुलाबी, अंक-१.
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  सिंह - शेअर्स व्यवहारांतून फायदा होईल. नव्या ओळखींतून व्यवसाय व़ृध्दी होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. छान दिवस. शुभ रंग : जांभळा, अंक-९
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  कन्या - खर्च वाढता असला तरीही आर्थिक लाभही होणार आहेत. अनुकूल ग्रहमान असल्याने यशप्राप्ती कठीण नाही. प्रवासात मात्र खिसा सांभाळा. शुभ रंग: निळा, अंक-४.
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  तूळ - संमिश्र ग्रहमानाचा आजचा दिवस. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. काही प्रकृतीच्या तक्रारी त्रस्त करतील.गृहीणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवावी. शुभ रंग : तांबडा, अंक-१.
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  वृश्चिक - व्यवसायात अडकलेला पैसा वसूल होईल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. आज गप्पांतून गैरसमज वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. शुभ रंग : केशरी, अंक-२.
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  धनू - तुमचा अहंकार वाढवणारी घटना घडेल. आज कोणत्याही प्रसंगी स्वत:च्या मतावर ठाम रहाल. कठोर शब्दप्रयोग टाळा कारण त्याने नाती दूरावतील.  शुभ रंग : हिरवा, अंक-६. 
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  मकर - उगीचच त्रागा करु नका. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणं शक्य नाही. पर्यटनाची इच्छा पूर्ण होईल. गृहीणींचे आवडत्या छंदात मन रमेल. शुभ रंग : पांढरा, अंक-५.
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  कुंभ - जोडीदाराच्या कतृत्वाचा अभिमान वाटेल. आज खिशात पैसा खेळता असल्याने उच्च रहाणीमानास प्राधान्य द्याल. प्रिय व्यक्तिसह हौसमौज कराल. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-3.
 • Saturday 9 June 2017 daily horoscope in Marathi
  मीन - आज तुमचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या घटना घडतील. राजकारणी शत्रूपक्षाला पुरुन उरतील. आज विद्यार्थी गुरुंच्या व पालकांच्या आज्ञेत राहतील.  शुभ रंग : राखाडी, अंक-८.

Trending