Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi

6 राशींसाठी चांगला आणि काही लोकांसाठी ठीक नाही रविवार...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 11, 2017, 08:26 AM IST

12 मधील 6 राशींसाठी हा रविवार चांगला असेल. सुट्टीचा दिवस आरामात जाईल. मेष, सिंह, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांचा मूड चांगला राहिल.

 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  12 मधील 6 राशींसाठी हा रविवार चांगला असेल. सुट्टीचा दिवस आरामात जाईल. मेष, सिंह, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांचा मूड चांगला राहिल. हे लोक कुटूंबासाठी वेळ काढतील. धन लाभ होण्याचे योग आहेत. तर वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुळ आणि मकर राशीच्या लोकांना धावपळ करावी लागू शकते. या 6 राशींसाठी संडे अडचणीचा ठरु शकतो...

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे तुमचे भविष्य...

 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मेष 
  एखाद्या चांगल्या बातमीने दिवसाची सुुरुवात होईल. गुरुतुल्य व्यक्ती योग्य सल्ला देतील. उद्योगधंद्यात काही अनुकूल घटनांनी मनाचे नैराश्य दूर होईल. शुभरंग : आकाशी, अंक-३. ​
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  वृषभ 
  पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. आपल्या मर्यादा ओळखून वागलात तर बरे होईल. आज जोडीदार लहरीपणे वागेल. कोणतीही रिस्क नकोच. शुभरंग : हिरवा, अंक- ६. ​
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मिथुन 
  आर्थिक विवंचना मिटतील. तुमच्या कार्यशक्तीचा विरोधकांना प्रत्यय येईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील.अहंकारास लगाम घालणे गरजेचे शुभरंग : गुलाबी, अंक-१. 
   
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कर्क 
  येणी वसूल झाल्याने आज व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. प्रकृतीच्या तक्रारींमुळे ज्येष्ठांची चिडचीड होईल. नोकरांना त्यांच्या मर्यादेतच ठेवा. शुभरंग : स्ट्रॉबेरी, अंक-६
   
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  सिंह 
  नोकरी व्यवसायात काही मनासारख्या गोष्टी घडल्याने मन प्रसन्न असेल. मित्रमंडळींत मोठेपणासाठी खर्च कराल. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. शुभरंग: पोपटी, अंक-५. 
   
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कन्या 
  कार्यक्षेत्रातवेळीच अचूक निर्णय घेतल्याने तुमच्या प्रगतीचा वेग वाढेल. वारसा हक्काने काही लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. यशदायी दिवस. शुभरंग : तांबडा, अंक-८. 
   
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  तूळ 
  मन काहीसे चंचल राहील. एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला फार लावून घ्याल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. उष्णतेचे विकार त्रासदायक होतील. शुभरंग : मरून, अंक-१. 
   
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  वृश्चिक 
  आज हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यशाची खात्री आहे. आर्थिक कमाईचे नवे मार्ग सुचतील. विरोधकांचा जोर कमी होईल. आशादायी दिवस. शुभरंग: नारिंगी, अंक-४.
   
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  धनू 
  गृहसौख्याचा दिवस असून आज उद्योग व्यवसायातही अनुकूलता राहील. ज्येष्ठांनी नामस्मरणावर भर द्यावा. गुरुकृपेचा लाभ होईल. प्रसन्न दिवस. शुभरंग : पांढरा, अंक-४. 
   
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मकर 
  जे चाललंय ते खूपच छान चाललंय. उगीच मृगजळाच्या मागे धावून एनर्जी वाया घालवू नका. वादाचे विषय युक्तीने हाताळणे गरजेचे आहे . शुभरंग : मोतिया, अंक-९. 
   
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कुंभ 
  कार्यालयीन कामात आज वरिष्ठांची शाबासकी मिळेल. आर्थिक आवक चांगली असल्याने खरेदीचे बेत आखाल. मुलांचे लाड पुरवाल. आनंदी दिवस. शुभरंग : डाळिंबी, अंक-७. 
   
 • Sunday 11 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मीन 
  काही कारणास्तव तुम्ही मानसिक ताणावात असाल. कामानिमित्त बरीच धावपळ होईल. पैशाचे नियोजन तसेच बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. शुभरंग : पिवळा, अंक-२. 
   
Trending