Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | There Are 4 Types Of Dreams, Know About Them

4 प्रकारचे असतात स्वप्न, वाईट स्वप्न पडल्यास काय करावे?

जीवनमंत्र डेस्क | Update - May 31, 2017, 10:37 AM IST

सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पडते. स्वपन पडणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे, परंतु आपल्या समाजात स्वप्नाशी संबंधित विविध मान्यता आहेत.

 • There Are 4 Types Of Dreams, Know About Them
  सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पडते. स्वपन पडणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे, परंतु आपल्या समाजात स्वप्नाशी संबंधित विविध मान्यता आहेत. स्वप्न आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात असे मानले जाते. काही स्वप्नांचे फळ शुभ मानले जाते तर काहींचे अशुभ.

  स्वप्न ज्योतिष शास्त्रानुसार स्वप्न चार प्रकारचे असतात-
  पहिला प्रकार - दैविक
  दुसरा प्रकार - शुभ
  तिसरा प्रकार - अशुभ
  चौथा प्रकार - संमिश्र
  मान्यतेनुसार, स्वप्नांचे हे सर्व प्रकार भविष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींचे संकेत देतात.
  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, स्वप्नांविषयी इतर काही खास गोष्टी...

 • There Are 4 Types Of Dreams, Know About Them
  1. दैविक आणि शुभ स्वप्न कार्यसिद्धी म्हणजेच कामामध्ये यश मिळणार असल्याचे संकेत देतात.
  2. अशुभ स्वप्न कार्य होणार नसल्याचे संकेत देतात आणि संमिश्र स्वप्न संमिश्र फलदायक असतात.
  3. स्वप्न ज्योतिष शास्त्रानुसार रात्रीच्या पहिल्या प्रहरात (9 ते 12 दरम्यान)पडलेल्या स्वप्नाचे फळ एक वर्षाच्या आत मिळते. दुसऱ्या प्रहरात (12 ते 01 दरम्यान)पडलेल्या स्वप्नाचे फळ सहा महिन्याच्या आत मिळते. 
 • There Are 4 Types Of Dreams, Know About Them
  4. तिसऱ्या प्रहरात (1 ते 4 दरम्यान)पडलेल्या स्वप्नाचे फळ तीन महिन्यांच्या आत मिळते आणि पहाटे पडलेल्या स्वप्नाचे फळ 24 तासांच्या आत मिळते.
  5. रात्री पडलेले वाईट स्वप्न लगेच एखद्या व्यक्तीला सांगितल्यास त्या स्वप्नाचा प्रभाव नष्ट होतो किंवा सकाळी उठल्यानंतर महादेवाला नमस्कार करून तुळशीला जल अर्पण केल्यास वाईट स्वप्नाचे फळ नष्ट होते.
  6. रात्री झोपण्यापूर्वी भगवान विष्णू, शंकर, महर्षी अगस्त्य आणि कपिल मुनींचे स्मरण केल्यास वाईट स्वप्न पडत नाहीत.

Trending