Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | These 5 Easy Remedies Can Solve Your Problems.

हे 5 सोपे उपाय दूर करु शकतात तुमच्या अडचणी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 11, 2017, 12:08 PM IST

कुटूंबात लहान-मोठे वादविवाद होतच असतात. परंतु हे वाद सतत होत असले तर घरात अशांति निर्माण होते.

 • These 5 Easy Remedies Can Solve Your Problems.
  कुटूंबात लहान-मोठे वादविवाद होतच असतात. परंतु हे वाद सतत होत असले तर घरात अशांति निर्माण होते. अनेक वेळा हे वाद खुप मोठे रुप घेतात. ही समस्या दूर करण्यासाठी खाली सांगितलेला उपाय करावा...

  उपाय
  ज्या भांड्यातून घरातील सर्व लोक पाणी पितात. त्यामधील थोडेसे पाणी घ्या आणि घरातील प्रत्येक खोलीच्या कोप-यामध्ये थोडे-थोडे टाकावे. यावेळी मनातल्या मनात ओम शांति ओम हा मंत्र बोलत राहा. ही गोष्ट कोणालाच सांगू नका. आपोआप तुमच्या घरातील समस्या दूर होतील.

  इतर उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • These 5 Easy Remedies Can Solve Your Problems.
  बरकत वाढवणारे उपाय
  आपण जेवढे पैसे कमावतो. तेवढे खर्च होत असतील तर समजून घ्या तुमच्या घरात बरकत नाही. तुम्ही कितीही कमावले तरी त्यामधून बचत होत नाही. तर खालील उपाय करावा. फायदा होईल.
  उपाय
  तुम्ही रस्त्याने जात असताना तुम्हाला एखादे किन्नर दिसले तर त्याला काही पैसे द्यावे. तुम्ही त्याला भोजन खाऊ घालू शकतात. यानंतर त्यांच्याकडून एक रुपयाचे नाणे घ्या. हे नाणे आपला गल्ला, कॅश बॉक्स किंवा धन असणा-या ठिकाणावर ठेवा. या उपायाने तुमची सेविंग वाढू शकते आणि इनकम वाढेल.
   
 • These 5 Easy Remedies Can Solve Your Problems.
  रोगांपासून मुक्तिसाठी उपाय
  महादेव प्रत्येक इच्छा पुर्ण करतात. सोमवारी तुम्ही खालील उपाय केला तर रोगांपासून सुटका मिळू शकते.

  उपाय
  कोणत्याही सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध आणि काळ्या तिळाने अभिषेक करा. अभिषेक करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करु नका. अभिषेक कराताना  ऊँ जूं स: मंत्र जाप करत राहा. यानंतर महादेवाला रोग निवारणासाठी प्रार्थना करा. महादेवाच्या कृपेने तुम्ही लवकरच रोग मुक्त व्हाल.
   
 • These 5 Easy Remedies Can Solve Your Problems.
  चतुर बुध्दीसाठी उपाय
  तुमची बुध्दी चतुर असेल तर तुम्ही मोठे मोठे काम सहज करु शकता. अनेक संकटांवर मात करु शकता. तुम्हाला वाटत असेल की आपण चतुर असावे तर खालील मंत्र जाप करा. या मंत्राने बुध्दी चतुर होते.

  मंत्र 
  सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्थ ह्रदि संस्थिते।
  स्वर्गापवर्गके देवि नारायाणि नमोस्तुते।।
  जाप विधि
  - रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीसमो तुपाचा दिवा लावा.
  - यानंतर कुशच्या आसनावर बसून तुळशीच्या माळेने या मंत्राचा जप कमीत कमी 108 वेळा करा.
  - थोड्या दिवसातच तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन दिसेल.
   
 • These 5 Easy Remedies Can Solve Your Problems.
  मनासारख्या नोकरीसाठी उपाय
  सध्याच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. नोकरी नसल्यामुळे घर आणि समाजात मानसुध्दा मिळत नाही. अनेक प्रयत्न करुनही नोकरी रोजगार मिळत नाही. परंतु निराश होण्याची गरज नाही. काही सोपे उपाय केल्याने तुमची ही समस्या दूर केली जाऊ शकते.
  उपाय
  एखाद्या शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन सव्वा किलो मोतीचूरच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. तुपाचा दिवा लावा आणि मंदिरात बसून लाल चंदन किंवा मूंगाच्या माळेने 108 वेळा खाली लिहिलेल्या मंत्राचा जप करा.
  चौपाई- कवन सो काज कठिन जग माही।
  जो नहीं होय तात तुम पाहिं।।
  यानंतर 40 दिवस रोज आपल्या घरातील मंदिरात या ओळींचा 108 वेळा जाप करा. तुमच्या समस्या लवकरच दूर होईल.
   

Trending