जूनचा पहिला दिवस / जूनचा पहिला दिवस काहीसा असा राहील तुमच्यासाठी, होतील हे फायदे

Jun 01,2017 08:10:00 AM IST
1 जूनला गुरुवारी मघा नक्षत्र असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी ही ग्रह स्थिती ठीक नाही. महिन्यातील पहिल्याच दिवशी काही लोक चिंताग्रस्त राहतील. नोकरी, बिझनेस, प्रॉपर्टी आणि गुंतवणूक इ. कामामध्ये या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. तणाव आणि व्यर्थ धावपळीचा राहील दिवस. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी महिन्यातील पहिला दिवस ठीकठाक राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील महिन्यातील पहिला दिवस....
मेष - एखादी उल्लेखनिय कामगिरी कराल. वेळेचा सदुपयोग केल्याने तुमच्या मेहेनतीस न्याय मिळेल. विलासी वृत्तीवर थोडसे नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. शुभ रंग : पांढरा, अंक-३.वृषभ - आज तुम्ही निस्वार्थीपणे काही कामे कराल. एखादी सुवार्ता कानी येण्याची शक्यता आहे. आज तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. शुभ रंग : लाल, अंक-८.मिथुन - दिवस धवपळीचा आहे. आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल. दैनंदीन व्यवहारात काही अडचणी निर्माण होतील. कामाचे तास वाढवावे लागतील. शुभ रंग : साेनेरी, अंक-6.कर्क - दुकानदारांच्या गल्ल्यात वाढ होईल. हौसमौज करण्याकडे कल राहील. आज पैशाचे योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. शब्द जपून वापरा. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-४.सिंह - व्यवसायात स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपली तत्व गुंडाळून ठेवून मागणी तसा पुरवठा या धोरणाने वागावे लागेल. नव्या कल्पना वेळीच आमलात आणा. शुभ रंग : निळा, अंक-६.कन्या - दूरवरचे प्रवास कार्यसाधक होतील. आज जास्त लाभच्या आशेने हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नसत्या उठाठेवी न करता आपला स्वार्थ पहा. शुभ रंग : मोरपंखी, अंक-९.तूळ - आर्थिक अडचणी काढता पाय घेणार आहेत. स्थावराच्या संदर्भातील काही महत्वाचे व्यवहार मार्गी लागतील. आज एखादा अकस्मिक धनलाभही होऊ शकतो. शुभ रंग : राखाडी, अंक-७.वृश्चिक - तुम्हाला उपदेश करणारांची आपसांत चढाओढ लागेल. कष्टांच्या प्रमाणांत मोबदला कमीच राहील. कमीच बोला. बोलण्याने हितचिंतक दुखावले जातील. शुभ रंग : आकाशी, अंक-५.धनू - आज नास्तिक मंडळीही देवाला एखादा नवस बोलतील. उद्योग व्यवसायात अनेक स्पर्धक निर्माण झालेले आहेत. वशिल्याशिवाय कामे होणार नाहीत. शुभ रंग : हिरवा, अंक-9.मकर - ऐकावे जनाचे, करावे मनाचे हेच धोरण ठेवावे. मोफत सल्लागार मंडळींना आज कोपरापासून नमस्कार करणेच हिताचे राहील. आज वाहन हळूच चालवा. शुभ रंग : जांभळा, अंक-६.कुंभ - दिवस प्रतिकूल असताना अविचारीपणाने महत्वाचे निर्णय घेऊ नका. अती आक्रमकता आज नुकसानास कारणीभूत होईल. भावी योजना गुप्त ठेवा. शुभ रंग : मोतिया, अंक-४.मीन - कंजूषपणा बाजूला ठेऊन काही योग्य कामासाठी खर्च करावाच लागेल. काहीजणांना जोडीदाराची नाराजी पत्करावी लागणार आहे. तब्येत नरम राहील. शुभ रंग : अबोली, अंक-२.
X