Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction

12 ते 18 जून : सूर्य-शनि समोरासमोर, असा राहील तुमच्यासाठी हा आठवडा

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 12, 2017, 09:04 AM IST

12 ते 18 जून या काळात सूर्य आणि चंद्र राशी परिवर्तन करतील. चंद्र धनु राशीपासून मीन राशीपर्यंत जाईल तर सूर्य मिथुन राशीमध्ये मंगळ ग्रहासोबत राहील.

 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  12 ते 18 जून या काळात सूर्य आणि चंद्र राशी परिवर्तन करतील. चंद्र धनु राशीपासून मीन राशीपर्यंत जाईल तर सूर्य मिथुन राशीमध्ये मंगळ ग्रहासोबत राहील. यामुळे आठवड्यातील काही दिवस सूर्य-शनी समारोसमोर राहतील. या ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी या काळात सांभाळून राहावे. धनहानी, वाद आणि व्यर्थ खर्च या काळात वाढू शकतात. इतर सात राशीच्या लोकनासाठी दिवस खास राहील. धनलाभ तसेच भाग्याची मदत मिळण्याचे योग आहेत.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या लोकांनी राहावे सावध आणि कोणाला होणार धनलाभ...

 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  मेष
  शुक्राचे संक्रमण अाहे. जास्त कामे असली तरी कामे वेळेवर संपन्न हाेतील. नवीन कार्य करण्याची इच्छा हाेईल. तसेच सरकारी याेजनांचा लाभ मिळेल. उत्पन्नाचा स्त्राेत चांगला राहील. प्रवास सुखाचा हाेईल. हा अाठवडा अजून जास्त लाभदायी राहण्याची शक्यता अाहे. कुटुंबाचे पाठबळ मिळेल.

  व्यवसाय वा व्यापार : नाेकरीत चांगले करता येईल व व्यवसाय उत्तम.
  शिक्षण : साेबत असलेल्या लाेकांपेक्षा चांगले प्रदर्शन राहील व साधने मिळतील.
  अाराेग्य : सरळ पायात दुखू शकते किंवा कमरेत त्रास जाणवू शकताे. 
  प्रेम : संबंध दृढ हाेतील, विश्वास वाढेल. वैवाहिक संबंध मधुर राहतील.
  व्रत : महादेवाला बेलपत्र अर्पण करा.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  वृषभ
  मंगळवार नंतर योग्य कार्यासाठी अग्रेसर व्हाल अथवा योग्य मार्गदर्शन मिळेल. शनिचा प्रभाव राहील. परंतु, स्वत: प्रयत्न केल्यास यश मार्ग साधता येईल. उत्पन्न चांगले राहील. प्रलंबित राहिलेली कामे देखील मार्गी लागण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात एखादे मोठे यश प्राप्त कराल. 

  नोकरी व व्यवसाय : पुढे जाण्याची हिम्मत दाखवू शकतात. 
  शिक्षण : युक्तीने समस्या सोडवू शकाल आणि पुढे जाण्यात यशस्वी व्हाल.
  आरोग्य : खांदा-कमरेमध्ये चमक भरू शकते. खोल पाण्यापासून दूर रहा.
  प्रेम : पत्नीकडून सहकार्य मिळेल. लग्नाचे प्रस्ताव प्राप्त होतील. 
  व्रत : गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  मिथुन
  सातव्या चंद्राचा अाणि मंगळाचा संक्रमण काळ जमिनीच्या कामात व्यत्यय वाढवू शकताे. उर्वरित कामांत काेणताच बदल हाेण्याची शक्यता नाही. भावांचे सहकार्य मिळेल व प्रदर्शन श्रेष्ठ राहील. उत्पन्न सामान्य राहील. राजपक्षामुळे लाभ हाेईल. चतुर्थ गुरू मनाला  विचलित ठेवेल.

  व्यवसाय वा व्यापार : नवीन लाेकांशी संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी तपास करा.
  शिक्षण : प्रगत संसाधने उपलब्ध हाेतील. शिक्षक मदत करतील.
  अाराेग्य : प्रसन्नता राहील. तसेच दातांमध्ये विकार उद्भवू शकतात.
  प्रेम : प्रेमाच्या बाबतीत क्षती हाेऊ शकते. व्यवहार्य बनून निर्णय घ्यावा.
  व्रत : गोपाल सहस्रनामाचा सकाळी पाठ करा.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  कर्क
  षष्ठम चंद्रमा वेळ सामान्य राहील. मन विचलित होईल. मनातील सफलतेसाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. मंगळवार, बुधवार चांगला जाईल. परंतु, गुरुवार, शुक्रवारी अनावश्यक खर्च होईल, विघ्न येतील.  शनिवारपासून वेळ आपल्या हातात राहील. सहयोग मिळेल.

  नोकरी व व्यवसाय : व्यवसायात सतर्क रहा, खर्च अधिक, नोकरी ठिक
  शिक्षण : प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल. शिक्षक नाराज.
  आरोग्य : दातांमध्ये वेदना व कमरेत त्रास होऊ शकतो. 
  प्रेम : पत्नीची उपेक्षा दूर होईल. वैवाहिक प्रस्तावही मिळू शकतील.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  सिंह
  पाचव्या चंद्राचे काहीतरी माेठे यश मिळेल. धन तसेच अादरातिथ्यात वाढ हाेईल. मुलांपासून सुख मिळेल. तसेच प्रसन्नता कायम राहील. राजपक्षाने लाभ हाेईल. नवे दागिने देखील मिळू शकतात. महिलांसाठी हा काळ यश देणारा असेल. प्रतिष्ठित लाेकांना भेटण्याचा याेग येईल.

  व्यवसाय वा व्यापार : करिअरमध्ये बढती, कारभारात वाढीची शक्यता.
  शिक्षण : शिक्षक तसेच मित्र सहकार्य करतील वा अभ्यास उत्तम राहील.
  अाराेग्य : सर्दी वा अंगात ताप येऊ शकताे. अज्ञात गाेष्टींची चिंता राहील.
  प्रेम : प्रेम प्रस्ताव सफल होतील तसेच वैवाहिक समस्या दूर हाेतील.
  व्रत : मारुतीला तेलाचा दिवा लावावा.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  कन्या
  चतुर्थ चंद्रामुळे मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत बाधित होईल. परंतु, गुरूच्या चरणामुळे अन्य स्त्रोतातून मोठे उत्पन्न प्राप्त होऊ शकते.  कार्यक्षेत्रात धाेरण यशस्वी ठरेल आणि राजकीय तज्ज्ञांना लाभ होईल. विरोधी पक्ष नस्तनाभूत होतील. चरित्रावर संशय निर्माण केला जाऊ शकतो. गुप्त गोष्टीही बाहेर येण्याची शक्यता.

  नोकरी व व्यवसाय : नवे कार्य प्राप्त, जुने स्थिर. नोकरीत स्थिरता.
  शिक्षण : मेहनतीचे फळ प्राप्त होईल. अन्य मदतही मिळेल.
  आरोग्य : नस व पोटात वेदना होऊ शकतात. डाव्या पायातही वेदना होतील.
  प्रेम : प्रेम प्रस्तावात अपयश. वैवाहिक जीवन सुदृढ होईल.
  व्रत : गायत्री मंत्राचे दहा रोज जप करा. 
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  तुला
  राशीचा मालक शुक्राची दृष्टी अाहे. सुरुवात चांगली हाेईल. मात्र, बुधवारी अडचण येऊ शकते. कर्मचारी किंवा अधिनस्थ सहकार्य करणार नाहीत. गुरुवार नकाे असलेली कामे करायला लावेल. शुक्रवारी वेळेत सुधारणा हाेईल. उत्पन्नासह काम वाढेल व शुभ बातमी मिळेल. जास्त धन खर्च करु नका.

  व्यवसाय वा व्यापार : नवीन कार्य करण्यापासून वाचा, नाेकरीत नवी अाॅफर शक्य. 
  शिक्षण : अभ्यासात मागे राहू शकतात. कामे वेळेवर हाेऊ शकत नाहीत.
  अाराेग्य : गळा वा मानेत त्रात हाेऊ शकताे. ताप देखील येऊ शकताे.
  प्रेम :जीवनसाथीसाेबत नाराजी वाढेल. वैवाहिक संबंधात नुकसान.
  व्रत : लक्ष्मी मातेला तुपाचा दीवा लावा.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  वृश्चिक
  सूर्य बुधाची दृष्टी प्राप्त आहे. व्दितीय चंद्रमामुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. खर्चदेखील आवाक्यात राहणार नाही. बुधवारपासून उत्पन्नाचे प्रयत्न यशस्वी होतील. कार्यातील अडचणी दूर होतील. सप्ताहात सहकार्य  मिळण्याची आशा वाढेल. कुटुंबाचे सहकार्य,  यात्रा सुखद होतील. नवीन योजना अाखाल. 

  नोकरी व व्यवसाय : गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही. नोकरीत तणाव
  शिक्षण : अभ्यासात मेहनत अतिरिक्त करावी लागेल.स्वत:वर विश्वास ठेवा.
  आरोग्य : दात व कमरेत वेदना होऊ शकते. गळ्यातही समस्या.
  प्रेम : जीवनसाथीकडून उपेक्षा शक्य. वैवाहिक जीवनात सहयोग मिळेल. 
  व्रत : शनिवारी पिंपळाजवळ तुपाचा दिवा लावा.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  धनू
  मंगळची पूर्ण दृष्टी असेल तसेच शनि-चंद्राचा संक्रमणाचा हा काळ बलवान हाेईल. विदेशात राहणारे किंवा त्यासंबंधी कार्य करणाऱ्यांना चाैपट यश मिळेल. उत्पन्न तसेच अादरात वाढ हाेईल. घर-जमिनीतून लाभाची शक्यता. तसेच नवीन कामे देखील मिळण्याची अधिक शक्यता अाहे.

  व्यवसाय वा व्यापार : नाेकरीत लक्षाची प्राप्ती वा कारभारात प्रगती हाेईल.
  शिक्षण : पराक्रम श्रेष्ठ राहतील, सर्वांची मदत. प्रोजेक्ट यशस्वी.
  अाराेग्य : जुन्या अाजारांमध्ये सुधार वा त्वचेसंबंधी समस्यात वाढ.
  प्रेम : नवीन मित्र मिळतील तसेच वैवाहिक जीवनात शांतता नांदेल.
  व्रत : महादेवाला अाकर्षक फुलांचे पत्र वाहा.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  मकर
  मंगळाची दृष्टी व द्वादश चंद्रमा राहील. बुधवारपासून भावांचे सहकार्य व वादविवादात विजय मिळण्याचा योग आहे. सप्ताहाच्या मध्यात उत्पन्न चांगले व प्रसन्नताही टिकून राहील. सप्ताहात स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. उत्पन्नाच्या मार्गात सुधारणा येईल. नवीन कार्य संपादन होण्याची शक्यता आहे.

  नोकरी व व्यवसाय : व्यवसायासाठी बाहेर जावे लागेल. अधिकारी संतुष्ट . 
  शिक्षण : संसाधनाचे सहकार्य मिळणार नाही.  
  आरोग्य : उजव्या दाढीत वेदना होऊ शकते. सरळ पायातही वेदना होतील.
  प्रेम : सहयोगिनीसोबत  वेळ घालवाल. वैवाहिक सुख प्राप्त होईल.
  व्रत : श्रीरामाचे पूजन करा.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  कुंभ
  राहूची दृष्टी तसेच केतूचे संक्रमण झालेे अाहे. हा काळ उत्तम राहील. कामे अधिक राहतील. तसेच अाईचे सुख मिळेल. काही कामे मजबुरीमुळे करावी लागतील. या अाठवड्यात माेठे यश मिळू शकते. कुटुंबीयदेखील भराेसा कायम ठेवतील. तसेच धार्मिक कार्यक्रमांना देखील जावे लागेल.

  व्यवसाय वा व्यापार : उत्पन्नांत वाढ. व्यापार उत्तम,  नाेकरीत स्थिरता.
  शिक्षण : अभ्यास उत्तम राहील, मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रोजेक्ट यशस्वी.
  अाराेग्य : खाेकला, सर्दीची समस्या येऊ शकते. ताप येण्याची शक्यता अाहे.
  प्रेम : मित्रांसाेबत उत्साहपूर्वक वेळ जाईल. लग्नाचा प्रस्ताव मिळेल.
  व्रत : हनुमानजीला फुलांचा हार घाला.
 • weekly horoscope 12 to 18 june 2017 astrology prediction
  मीन
  राशी स्वामी गुरूची दृष्टी राशीवर असेल. हा काळ मुलांपासून आनंद मिळवून देणारा आहे. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तसेच कार्यात सहकार्यांपेक्षा पुढे रहाल. चंद्राचा वेग बुधवारपासून धन व सन्मान मिळवून देणारा असेल. सुखद सूचना ऐकायला मिळेल. सप्ताहात माेठे कार्य संपन्न होऊ शकते.

  नोकरी व व्यवसाय : मशीन, लोह व अकाउंंटवाले सफल होतील.
  शिक्षण : वर्गात चांगले प्रदर्शन, सहयोग मिळेल. नवीन प्रयोग कराल. 
  आरोग्य : कमरेत व मानेमध्ये त्रास होऊ शकतो. थकवा जाणवेल.
  प्रेम : सहयोगिनीशी संबंध मधूर राहतील व वैवाहिक जीवनात तक्रार येऊ शकते.
  व्रत :  बेलपत्र महादेवाला अर्पण करा.

Trending