Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | 5 Things Should Be Removed From Home For Better Luck And Money

फक्त कोळ्याचं जाळं आणि वटवाघूळ नसते अशुभ, कबुतराचे घरटेही करते आर्थिक नुकसान

रिलिजन डेस्क | Update - Jul 28, 2018, 10:06 AM IST

घराच्या जवळपास असलेल्या गोष्टींचा घराच्या आर्थिक स्थितीवर थेट प्रभाव पडतो. असे मानले जाते की, घरामध्ये कोळ्याचे जाळं किं

 • 5 Things Should Be Removed From Home For Better Luck And Money

  घराच्या जवळपास असलेल्या गोष्टींचा घराच्या आर्थिक स्थितीवर थेट प्रभाव पडतो. असे मानले जाते की, घरामध्ये कोळ्याचे जाळं किंवा वटवाघूळ असू नये. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात. परंतु फक्त या दोन गोष्टी नुकसानदायक नाहीत. वास्तू शास्त्रानुसार कोळ्याचे जाळं आणि वटवाघूळ याशिवाय अशाही काही गोष्टी आहेत, ज्या घराच्या जवळपास असल्यास पैशांचे नुकसान होते. या गोष्टी घरातून आणि घराच्या जवळपास असल्यास लगेच काढून टाकाव्यात.


  कबुतराचे घरटे
  कधी-कधी कबुतर, चिमणी घरामध्ये घरटे तयार करतात. हे घरटे नकारत्मक ऊर्जा निर्माण करते. यामुळे घरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होते. यासोबतच यामुळे घरातील आर्थिक अडचणी वाढू शकतात. यामुळे घरातून हे घरटे काढून टाकावे.


  भिंतींवर ओलावा
  घर-दुकानातील भिंतींवर पाण्याच्या ओलाव्यामुळे विचित्र आकृती तयार झाल्यास असतील किंवा पापुद्रे निघत असल्यास लगेच भिंतीची डागडुजी करून घ्यावी. अन्यथा अशा भिंती दुर्भाग्याला आमंत्रित करतात.


  कोळ्याचं जाळं
  कोळ्याचं जाळंही घरात गरिबीला आमंत्रण देते. हेसुद्धा अस्वच्छतेमुळे घरात तयार होते. लक्ष्मी अस्वच्छ ठिकाणी निवास करत नाही. यामुळे कोळ्याचं जाळ घरात होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. हे दुर्भाग्याचे सूचक आहे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • 5 Things Should Be Removed From Home For Better Luck And Money

  वटवाघूळ किंवा घरात या पक्षाचे येणे-जाणे
  एखाद्या घरात वटवाघूळ असेल किंवा वारंवार ये-जा करत असेल तर हा दुर्भाग्य वाढवणारा संकेत आहे. वटवाघूळ नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे. यामुळे आरोग्य आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 

 • 5 Things Should Be Removed From Home For Better Luck And Money

  मधमाशीचं पोळं 
  ज्या घरांमध्ये योग्य पद्धतीने स्वच्छता होत नसेल तेथे मधमाश्या पोळं तयार करतात. मधमाशीचा दंश खूप वेदनादायी असतो. मधमाशीने दंश केल्यास त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. तसेच यामुळे घरात नकारत्मक ऊर्जा प्रवेश करते. हे पोळं अस्वच्छतेचा संकेत देते.

Trending