आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा, सुख आणि समृद्धीसाठी घरात ठेवा लाफिंग बुद्धा, पण या गोष्टींकडेही लक्ष द्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धन, सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी फेंगशुईमध्ये विविध अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होतात. मागील काही काळापासून फेंगशुईच्या या उपायांचे प्रचलनही वाढले आहे. फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाला अत्यंत शुभ मानण्यात येते. यांचा हसरा चेहरा घरात सकारत्मक ऊर्जा वाढवतो आणि सुख-समृद्धी प्रदान करतो. येथे जाणून घ्या, लाफिंग बुद्धाशी संबंधित टिप्स...


1. फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती ड्रॉईंग रूममध्ये ठेवावी.


2. लाफिंग बुद्धाच्या मूर्तीचे मुख नेहमी मेनगेटसमोर असावे. यामुळे शुभफळ प्राप्त होतात.


3. लाफिंग बुद्धाची मूर्ती कधीही किचन किंवा बेसमेंटमध्ये ठेवू नये.


4. लाफिंग बुद्धाची मूर्ती गिफ्ट स्वरूपात मिळाल्यास ही जास्त शुभफळ प्रदान करते.


5. लाफिंग बुद्धाची मूर्ती थोड्या उंच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा.

बातम्या आणखी आहेत...