आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या-छोट्या उपायांनीही दूर होऊ शकतो वास्तुदोष, तोडफोड करण्याची गरज नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात अडचणी येत आणि जात राहतात. यामधील काही अडचणी घरातील वास्तुदोषामुळे निर्माण झालेल्या असू शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, हे वास्तुदोष अत्यंत छोटे-छोटे उपाय करून दूर केले जाऊ शकतात. हे उपाय जास्त खर्चिक नाहीत तसेच यासाठी घराची तोडफोडही करावी लागत नाही. येथे जाणून घ्या, हे उपाय...


1. घराच्या पूर्व दिशेला दोष असल्यास ते दूर करण्यासाठी या दिशेच्या भिंतीवर सूर्यदेवाचा फोटो किंवा शो-पीस लावावा.


2. वास्तुनुसार, घरामध्ये बासरी ठेवणे शुभ मानले जाते. बासरी संमोहन, आनंद आणि आकर्षणचे प्रतीक मानली गेली आहे. बासरीमधून वाहणारी हवा नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक ऊर्जेत परिवर्तन करते.


3. घराला निगेटिव्ह एनर्जीपासून मुक्त ठेवण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला मातीच्या एक छोट्या भांड्यामध्ये मीठ भरून ठेवावे आणि प्रत्येक चोवीस तासाला मीठ बदलत राहावे.


4. घराच्या उत्तर-पूर्व भागात तुळस, मनीप्लँट, चामिली यासाखरे रोप लावल्याने निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते.


5. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ काढून टाकावे अन्यथा चालू करावे. बंद घड्याळामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.


पुढील स्लाईड्सवर पाहा, व्हिडीओ...

बातम्या आणखी आहेत...