आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृह प्रवेश करताना या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, जाणून घ्या शुभ तिथी, नक्षत्र आणि वार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्य शुभ मुहूर्त पाहून केले जाते. गृह प्रवेश करताना या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार गृह प्रवेश मुहूर्तामध्ये नक्षत्र, तिथी, वार आणि लग्नचा विशेष विचार केला जातो. या 4 गोष्टी लक्षात घेऊन गृह प्रवेश करणे लाभदायक राहते. येथे जाणून घ्या, गृह प्रवेशासाठी शुभ नक्षत्र, तिथी, वार आणि लग्न कोणते आहेत...


शुभ नक्षत्र - उत्तराफाल्गुनी, उत्तराआषाढा, उत्तराभाद्रपद, रोहिणी, मृगशिरा, चित्रा, अनुराधा आणि रेवती नक्षत्र गृह प्रवेशासाठी शुभ आहेत.


शुभ  तिथी - शुक्ल पक्षातील द्वितीय, तृतीया, पंचमी, षष्टी, सप्तमी, दशमी, एकादशी आणि त्रयोदशी तिथी गृह प्रवेशासाठी शुभ मानली जाते.


शुभ वार - गृह प्रवेशासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार शुभ आहेत.


शुभ लग्न - वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीचे लग्न उत्तम आहेत. मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीचे लग्न मध्यम आहेत. लग्नेश बली, केंद्र त्रिकोणात शुभ ग्रह आणि 3, 6, 10 आणि 11 व्या स्थानात पाप ग्रह असावेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गृह प्रवेश करताना इतर कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

बातम्या आणखी आहेत...