आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये कुठे ठेवावे अ‍ॅक्वेरियम, यातील एखादा मासा मेल्यास काय करावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल घरामध्ये फिश अ‍ॅक्वेरियम ठेवण्याचे चलन वाढत चालेले आहे. फेंगशुई शास्त्रामध्ये अ‍ॅक्वेरियमचे खास महत्त्व मानले गेले आहे. कारण घर-दुकानातील अ‍ॅक्वेरियममध्ये ठेवण्यात आलेल्या माशांमुळे तेथील सदस्यांवर येणारे संकट टळू शकते आणि घरामध्ये धन-संपत्ती स्थिर राहते. येथे जाणून घ्या, घर-दुकानात फिश अ‍ॅक्वेरियम ठेवताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


क्वेरियममध्ये किती असावी माशांची संख्या...
फेंगशुई शास्त्रानुसार अ‍ॅक्वेरियममध्ये माशांची संख्या आणि रंगला जास्त महत्त्व आहे. अ‍ॅक्वेरियममध्ये कमीत कमी नऊ मासे असणे आवश्यक आहे. यामध्ये आठ मासे लाल किंवा सोनेरी रंगाचे असावेत तर एक मासा काळ्या रंगाचा असावा. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांची संख्या नऊ सांगण्यात आली आहे. याच कारणामुळे फेंगशुई शास्त्रात नऊ मासे फिश अ‍ॅक्वेरियम ठेवण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.


कुठे ठेवावे फिश अ‍ॅक्वेरियम
फेंगशुई शास्त्रानुसार अ‍ॅक्वेरियम उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. फिश अ‍ॅक्वेरियम झोपण्याच्या किंवा स्वयंपाकाच्या खोलीत ठेवू नये. या स्थानावर फिश अ‍ॅक्वेरियम ठेवल्यास संपत्तीचा नाश होतो. वैवाहिक जीवनातील प्रेम कायम ठेवण्यासाठी फिश अ‍ॅक्वेरियम घराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ठेवावे.


का खास आहे काळ्या रंगाचा मासा
काळ्या रंगाच्या माशाचे एक खास महत्त्व आहे. काळ्या रंगाचा मासा सुरक्षेचा प्रतिक मानला जातो. घरातील फिश अ‍ॅक्वेरियममधील काळा मासा मृत झाल्यास मानले जाते की, त्याने कुटुंबातील एखाद्या सदस्यावर आलेले संकट स्वतःवर घेऊन घरातील इतर सदस्यांनाही सुरक्षित केले आहे. यामुळे घराच्या फिश अ‍ॅक्वेरियममध्ये काळ्या रंगाचा मासा अवश्य ठेवावा.


 

पुढे वाचा, मासा मृत झाल्यास काय करावे...

बातम्या आणखी आहेत...