आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेमध्ये वारंवार होत असलेले नुकसान थांबवतील या 8 टिप्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काहीवेळा बिझनेसमध्ये वारंवार नुकसानीला सामोरे जावे लागते. खूप प्रयत्न करूनही यातून मार्ग सापडत नाही. यामागे वास्तुदोष मुख्य कारण असू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार दुकान किंवा ऑफिसमध्ये काही गोष्टींकडे लक्ष डोळ्यास सर्व अडचणीतून मार्ग कडून उत्पन्न वाढवले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, वास्तूच्या काही सोप्या टिप्स.


1. ऑफिसमध्ये मालकाची कॅबिन सर्वात पहिले असू नये. वास्तू शास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही.


2. ऑफिसमध्ये डार्क रंग उदा. हिरवा, निळा, काळा वापरू नये. याउलट फिकट रंग उदा. पांढरा, क्रीम, पिवळा वापरावा. यामुळे ऑफिसमधील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढते.


3. ऑफिसमध्ये पाण्याची व्यवस्था उत्तर-पूर्व दिशेला असावी. असे केल्याने बिझनेसमध्ये वृद्धी होऊ शकते.


4. धनाच्या देवतेचा वास उत्तर दिशेला मानला जातो, यामुळे ऑफिसमध्ये कॅशियरची बसण्याची व्यवस्था उत्तर दिशेला करावी.


5. कॉम्प्युटर, विजेशी संबंधित मशीन आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला ठेवावेत. विजेशी संबंधित कामासाठी ही जागा चांगली मानली जाते.


6. वास्तुनुसार, एका टेबलवर एकापेक्षा जास्त लोकांनी बसू नये. एकाच टेबलवर जास्त लोक असल्यास याचा एकमेकांच्या कामावर निगेटिव्ह प्रभाव पडतो.


7. ऑफिसमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था अशाप्रकारे करा की, कोणाचीही पाठ ऑफिसच्या मेनगेटकडे येणार नाही.


8. ऑफिसमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशा रिकामी ठेवावी. पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करू शकता. या दिशेला मंदिर बनवणे फायदेशीर राहते.

बातम्या आणखी आहेत...