आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूममध्ये या 5 गोष्टींकडे लक्ष दिल्यास नवरा-बायकोतील वाढू शकते प्रेम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये सुख-समृद्धी आणि शांती कायम ठेवण्यासाठी वास्तू शास्त्रामध्ये विविध टिप्स सांगण्यात आल्या आहेत. वास्तू शास्त्र सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा सिद्धांतावर काम करते. यामध्ये सांगण्यात आलेल्या टिप्स लक्षात ठेवल्यास सकारात्मकता वाढते आणि नकारात्मकता दूर होते. उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार बेडरूममध्ये फुलांचे, लहान मुलांचे, कुटुंबियांचे फोटो लावू शकता परंतु हनुमानाचा फोटो लावू नये. येथे जाणून घ्या, पती-पत्नीसाठी 5 वास्तू टिप्स...


1. बेडरूममध्ये राधा-कृष्णचा फोटो लावू शकता परंतु हनुमानाचा फोटो लावू नये. उदास किंवा नकारात्मकता दर्शवणारे फोटो लावू नयेत.


2. पती-पत्नीने बेडरूमच्या खिडकीजवळ पलंग किंवा अंथरून टाकू नये. अशा बेडवर झोपल्याने मानसिक तणाव वाढतो. पती-पत्नीमधील ताळमेळ बिघडू शकतो.


3. बेडरूमच्या छतावर बीम दिसत असल्यास त्याच्याखाली पती-पत्नीने झोपू नये. त्या ठिकाणापासून थोडे दूर झोपावे.


4. पती-पत्नीचे अंथरून-पांघरून नेहमी स्वच्छ असावे. अस्वच्छ अंथरुणावर झोपू नये. फाटलेल्या किंवा छिद्र पडलेल्या चादर, बेडशीटचा वापर करू नये.


5. पलंगाच्या खाली कोणतेही सामान ठेवू नये. पलंगाच्या खालची जागा रिकामी ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. यामुळे बेडच्या चारही बाजूला सकारात्मक ऊर्जा कोणत्या बाधेशिवाय प्रवाहित होत राहील.

बातम्या आणखी आहेत...