आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम-दक्षिण दिशेला ठेवावे जड सामान, पैशांची तंगी दूर करतील हे वास्तू उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये वास्तुदोष असल्यास तेथे राहणाऱ्या लोकांना नकारात्मकतेला सामोरे जावे लागू शकते. या दोषामुळे व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. घरामध्ये ठेवण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूसाठी शुभ दिशा सांगण्यात आली आहे. घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास सकारात्मकता कायम राहते आणि भाग्याची मदत मिळू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, घरामध्ये वस्तू ठेवण्यासाठी कोणत्या दिशा शुभ राहतात...


> ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला व्यर्थ सामान ठेवू नये. कारण ही दिशा देवी-देवतांशी संबंधित आहे. या ठिकाणी व्यर्थ सामान ठेवल्यास धनहानीचे योग जुळून येऊ शकतात.


> बेडरूमच्या ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला जास्त वजनाचे जड सामान असल्यास ते कमी करावे. जड वस्तू रूमच्या नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) दिशेला ठेवावे. ईशान्य कोपरा जमल्यास रिकामा ठेवावा किंवा येथे हलके सामान ठेवावे.


> देवघर चुकीच्या दिशेला असल्यास वास्तुदोष वाढतात. देवघर ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला शुभ मानले जाते. उत्तर किंवा पूर्व दिशेला देवघर असल्यास त्याची जागा बदलण्याची आवश्यकता नाही. या दिशा देवघरासाठी शुभ राहतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तीन टिप्स...

बातम्या आणखी आहेत...