घरात चुकूनही या ठिकाणी लावू नये घड्याळ, अन्यथा वाढू लागेल दुर्भाग्य
वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा शुभ-अशुभ प्रभाव आपल्यावर पडत असतो. प्रत्येक वस्तू नकारात्मक किंवा सकारात्मक उर्जेला स्वतःकडे आकर्षित करते. एखादी वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर त्याचा वाईट प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो. एवढेच नाही तर घराच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाचाही शुभ-अशुभ प्रभाव पडतो. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या वास्तु विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घड्याळाशी संबंधित काही खास गोष्टी...