Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Main Door Tips For Destiny

मुख्य दार शुभ असल्यास घरात प्रवेश करते सुख, दूर होऊ शकतो वाईट काळ

रिलिजन डेस्क | Update - Jul 28, 2018, 09:21 AM IST

आपण राहत असलेल्या घरामध्ये पावित्र्य आणि सकारात्मकता असल्यास कामामध्ये बाधा निर्माण होत नाहीत आणि यश प्राप्त होते.

 • Main Door Tips For Destiny

  आपण राहत असलेल्या घरामध्ये पावित्र्य आणि सकारात्मकता असल्यास कामामध्ये बाधा निर्माण होत नाहीत आणि यश प्राप्त होते. घरात आनंदी वातावरण राहते. घराचे मुख्य द्वार आपली सुख-समृद्धी वाढवण्यामध्ये खास भूमिका बजावते. दरवाजा शुभ लक्षणयुक्त असल्यास घरात गरिबी प्रवेश करत नाही. शुभ दरवाजा देवी-देवतांना आकर्षित करतो. कोलकाताच्या ऍस्ट्रॉलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, दरवाजा शुभ बनवण्याचे काही खास उपाय...


  > घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास एखाद्या सोमवारी एक रुद्राक्ष दरवाजाच्या मधोमध लावावा. या उपायाने घरात नकारात्मकता येणार नाही.


  > घराच्या मुख्य दाराला आंबा किंवा अशोकाच्या झाडाच्या पानांचे तोरण बांधावे. पाने वाळून गेल्यानंतर नवीन तोरण बांधावे. असे केल्याने सर्व अडचणी दूर होऊ शकतात.


  > मुख्य द्वार पश्चिम दिशेला असल्यास रविवारी सूर्योदयापूर्वी दरवाजासमोर नारळ आणि काही नाणे ठेवून लाल कपड्यात बांधावेत. त्यानंतर ही सामग्री दरवाजावर लटकावून ठेवावी.


  > उत्तर दिशेचा दरवाजा लाभदायक राहतो. या दिशेला दरवाजा असल्यास भगवान विष्णूंची रोज पूजा करावी. पिवळ्या फुलांची माळ तयार करून दरवाजावर लावावी.


  > दक्षिण दिशेला दरवाजा असल्यास बुधवारी किंवा गुरुवारी लिंबू किंवा सात कवड्या दोऱ्यात बांधून दरवाजावर लटकावून ठेवाव्यात.


  > मुख्य दरवाजावर एखादे पवित्र चिन्ह लावावे, उदा. ऊँ, श्रीगणेश, स्वस्तिक, शुभ-लाभ इ. असे केल्याने घरावर सर्व देवी-देवतांची कृपा राहते आणि कोणाचीही वाईट दृष्ट लागत नाही.


  > घराचे मुख्य दार पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला असल्यास घरामध्ये एक भांड्यात पाणी भरून त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात. हा उपाय रोज करावा.

Trending