Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Mythological Tips About Temple, God And Goddess Statues In Home

सुख-समृद्धी हवी असल्यास देव मूर्तीशी संबंधित या चुकांपासुन दूर राहा

रिलिजन डेस्क | Update - Jul 24, 2018, 12:18 PM IST

देवी-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी लोक घरामध्ये देवी-देवतांच्या मूर्ती स्थापन करतात. मान्यतेनुसार घरामध्ये देवतांची म

 • Mythological Tips About Temple, God And Goddess Statues In Home

  देवी-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी लोक घरामध्ये देवी-देवतांच्या मूर्ती स्थापन करतात. मान्यतेनुसार घरामध्ये देवतांची मूर्ती किंवा फोटो असल्यास अडचणी दूर होतात. मंदिरात पूजा करताना घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार घरामध्ये सर्व देवतांच्या मूर्ती ठेवू नयेत. देवतांचे असे काही स्वरूप आहेत, जे घरात ठेवणे शुभ नाही तर अशुभ मानले जाते. येथे जाणून घ्या, घरामध्ये कोणकोणत्या देवतांच्या मूर्ती ठेवू नयेत...


  भैरव देव
  शिवपुराणानुसार भैरव देवाला महादेवाचा अवतार मानले जाते. घरामध्ये छोटेसे शिवलिंग ठेवू शकता परंतु महादेवाचे अवतार भैरव देवाची मूर्ती घरात ठेवण्यापासून दूर राहावे. भैरव देव तंत्रचे देवता मानले जातात आणि यामुळे यांची पूजा घराबाहेर करावी. भैरव देव खुल्या स्थानावर राहतात.


  नटराज
  महादेवाचे रौद्र रूप म्हणजे नटराज. या स्वरूपात शिव तांडव करताना दिसतात. ही मूर्ती घरात ठेवल्याने अशांती वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांचा स्वभाव क्रोधी होऊ शकतो.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर कोणत्या देवतांची मूर्ती घरात ठेवू नये...

 • Mythological Tips About Temple, God And Goddess Statues In Home

  शनिदेव
  ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला न्यायाचे देवता मानले गेले असून हा एक क्रूर ग्रह आहे. शनिदेव सूर्यपुत्र आहेत. यांची मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते. शनिदेवाची पूजा घराबाहेर करावी.

 • Mythological Tips About Temple, God And Goddess Statues In Home

  राहू-केतू
  राहू आणि केतू छाया ग्रह आणि पाप ग्रह मानले जातात. ज्योतिष मान्यतेनुसार राहू-केतूची पूजा केल्यास आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकतो परंतु यांची पूजा घरात नाही तर घराबाहेर एखाद्या मंदिरात करावी. घरामध्ये या मूर्ती ठेवल्याने अशुभ फळ प्राप्त होऊ शकतात.

Trending