मुलांच्या उज्वल भविष्यासाठी / मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आई-वडिलांनी लक्षात ठेवाव्यात या 10 गोष्टी

Aug 01,2018 11:55:00 AM IST

मुलांना शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त व्हावे यासाठी वास्तूच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वास्तू घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. घरातील वातावरण सकारात्मक असल्यास मुलांचे अभ्यासात मन लागते. वास्तूमध्ये स्टडी रूमशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. येथे जाणून घ्या, स्टडी रूमशी संबंधित काही खास वास्तू टिप्स...


1. विद्यार्थ्यांनी ईशान्य कोपऱ्याकडे(उत्तर-पूर्व) मुख करून अभ्यास करावा. या दिशेला मुख करून अभ्यास करणे शक्य नसल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून अभ्यास करू शकता. दक्षिण दिशेला मुख करून अभ्यास करणे शुभ मानले जात नाही.


2. स्टडी रूममध्ये चहापाणी किंवा नाश्ता केला असल्यास खरकटे भांडे, प्लेट लगेच काढून टाकावेत.


3. स्टडी रूममध्ये पूर्व-उत्तर दिशेला खिडकी असणे श्रेष्ठ राहते.


4. या रूमचे छत पिरॅमिड आकाराचे असल्यास जास्त उत्तम राहते. अशा रूममध्ये करण्यात आलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहतो.


5. अभ्यास करताना रूममधील वातावरण शुद्ध असावे. वातावरणात दुर्गंध असू नये.


6. अभ्यासाच्या टेबलवर आवश्यक सामग्री असावी. अनावश्यक सामग्री लगेच काढून टाकावी, अन्यथा अभ्यास करताना मन इकडे-टाकडे भटकू शकते.


7. अभ्यास करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ ब्रह्म मुहूर्त आहे. सूर्यदयाच्या ठीक आधी म्हणजे सकाळी 4.30 ते 10 या वेळेत अभ्यास करणे लाभदायक ठरते. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे आरोग्यासाठी ठीक राहत नाही.


8 स्टडी रूममध्ये पुस्तक दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवू शकता. उत्तर-पूर्व दिशेला हलके सामान ठेवावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

9. स्टडी रूममध्ये देवी सरस्वती, श्रीगणेश किंवा इतर प्रिय देवी-देवतांचे फोटो लावू शकता. या रूममध्ये अभ्यासाशी संबंधित फोटो लावावेत. प्रेरक फोटोही लावू शकता. नकारात्मक विचारांचे, चित्रपटांचे, प्रेमाचे फोटो लावू नयेत.10. स्टडी रूमचा रंग फिकट पिवळा किंवा पांढरा असल्यास उत्तम राहील. गडद रंगाचा उपयोग टाळावा. या रूममध्ये आरसा नसावा.
X