आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्व देवतांची पुजा मुर्तीच्या स्वरुपतात केली जाते. मात्र महादेव असे एकमेव आहेत, ज्यांची पुजा लिंग स्वरुपात केली जाते. शिवलिंगच्या पुजेचे महत्त्व अनेक ग्रंथ आणि पुराणांमध्ये सांगितले आहे. मात्र शिवलिंग पुजनाच्या परंपरेची सुरुवात कशी झाली, याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. सर्वप्रथम शिवलिंगाची पुजा कोणी केली आणि शिवलिंगाच्या पुजेची परंपरा कशी सुरू झाली, याबद्दल लिंगमहापुराणमध्ये एक कथा आहे.
अशी झाली होती पहिल्या शिवलिंगाची स्थापना
लिंगमहापुराण अनूसार, एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णु यांच्यामध्ये श्रेष्ठतेवरुन विवाद सरू होता. स्वत:ला अधिक श्रेष्ठ ठरवण्यासाठी दोघेही जण एकमेकांचा अपमान करू लागले. त्यांच्यामधील विवाद फार वाढला, तेव्हा पूर्णपणे अग्निने वेढलेले एक लिंग भगवान ब्रह्मा आणि विष्णु यांच्या मधोमध स्थापित झाले.
दोघेही जण या लिंगाचे रहस्य समजू शकले नाही. त्या अग्नियुक्त लिंगाचे मुख्य स्त्रोत जाणुन घेण्यासाठी भगवान ब्रह्माने लिंगाच्या वरच्या दिशेने व विष्णुने लिंगाच्या खाली जाणे सुरू केले. हजारो वर्ष शोध घेतल्यानंतरही ते लिंगाचे स्त्रोत शोधू शकले नाही. शेवटी दोघेही देव सुरूवातीला ज्याठिकाणी त्यांनी लिंग पाहिले होते तेथे आले. तेथे येताच त्यांना 'ओम' हा स्वर ऐकू येऊ लागला. तेव्हा त्यांना समजले की, ही काहीतरी शक्ती आहे आणि ते ओम या स्वराची आराधना करु लागले.
भगवान ब्रह्मा आणि विष्णुच्या आराधनेने खुश होऊन त्या लिंगातून भगवान शिव प्रकट झाले आणि दोन्ही देवांना सद्बुद्धीचे वरदान दिले. त्यानंतर भगवान महादेव अंतर्धान झाले व एका महादेवाच्या रुपात स्थापित झाले. लिंगमहापुराण अनूसार भगवान महादेवाचे ते पहिले शिवलिंग होते.
पुढील स्लाइडवर वाचा, अधिक माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.