आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये सुख आणि पैसा घेऊन येते तीन पायांचे असे बेडूक, किचनमध्ये ठेवू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चायनीज वास्तू शास्त्र फेंगशुईमध्ये विविध प्राण्यांना भाग्योदय करणारे मानले गेले आहे. यामध्ये कासव, घोडा, उंट आणि बेडूक इ. प्राण्यांचा समावेश आहे. यामध्ये तीन पाय असलेले बेडूक गुडलक आणि धनलाभासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. सामान्यतः बाजारात तांब्याचे नाणे तोडांत घेतलेले बेडूकची मूर्ती मिळते. ही मूर्ती घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आतील बाजूस येत आहे अशाप्रकारे ठेवावी.


फेंगशुईनुसार बेडूक जल तत्त्वाचे प्रतीक आहे. हे किचनमध्ये ठेवू नये. येथे हे ठेवल्यास धनाची आवक थांबते कारण किचन अग्नी तत्त्वाचे स्थान आहे. अग्नी आणि जल परस्पर विरोधी स्वभावाचे आहेत. यामुळे किचनमध्ये बेडकाची मूर्ती ठेवल्यास या दोन्ही तत्त्वांचे संतुलन बिघडू शकते. घरामध्ये तीन पायांचे बेडूक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाऊ शकते.


पहिली जागा आहे पूर्व दिशा. घराचे ड्रॉईंग रूम पूर्व दिशेला असल्यास येथे तीन पायांचे बेडूक ठेवू शकता. हे मेनगेटच्या आत येत आहे अशाप्रकारे ठेवावे. पूर्व दिशेला ठेवणे शक्य नसल्यास उत्तर दिशेला ठेवावे. ही दिशासुद्धा देवता आणि पाण्याची मानली जाते. या दिशेला बेडूक मूर्ती ठेवणे शुभ राहते. ड्रॉईंग रूममध्ये ठेवणे शक्य नसल्यास तुम्ही घरातील ज्वेलरी आणि पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवू शकता.


हे धनाचे प्रतीक आहे. कर्जामध्ये अडकलेले असाल तर ही मूर्ती घरात ठेवल्यास फायदा होऊ शकतो. दुकानात उधारी वाढली असेल तर दुकानातही तिजोरीजवळ ही मूर्ती ठेवल्यास वसुलीची शक्यता वाढते. तुमचा बिझनेस असल्यास वर्किंग टेबलवर ही मूर्ती ठेवू शकता. यामुळे बिझनेस वाढण्याची शक्यता वाढते.

बातम्या आणखी आहेत...