Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

3 ग्रहांमुळे बिघडतील कामे, वाढू शकतात या 6 राशींच्या अडचणी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 02, 2018, 12:00 AM IST

सूर्य-शनि आणि शुक्राची सरळ द्रुष्टी चंद्रावर असल्यामुळे याचा अशुभ प्रभाव 6 राशींवर पडेल.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  सूर्य-शनि आणि शुक्राची सरळ द्रुष्टी चंद्रावर असल्यामुळे याचा अशुभ प्रभाव 6 राशींवर पडेल. मंगळवारी कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीचे लोक टेंशनमध्ये राहतील. या तीन ग्रहांमुळे कामामध्ये अडचणी येतील. वाद होण्याचे योग आहेत आणि अडचणी वाढू शकतात. या ग्रहांमुळे वायफळ खर्च आणि नुकसान होऊ शकते. यासोबतच इतर 6 राशीच्या लोकांचा ग्रहांच्या वाईट प्रभावापासून बचाव होईल.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर राशीफळ...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  मेष :कार्यक्षेत्रातील उत्साही घटना मनाला दिलासा देतील. प्रगतीचे नवे मार्ग सापडतील. काही कौटुंबिक समस्या आज संयमाने सोडवता येतील. आशादायी दिवस. शुभ रंग : राखाडी, अंक-८.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  वृषभ : जे भाग्यात आहे ते आज सहजच मिळणार आहे. उगीच स्पर्धेच्या जाळ्यात अडकू नका. तुमचा हसतमुख स्वभाव हा हितशत्रूंची पोटदुखी ठरणार आहे. शुभ रंग : लाल, अंक-३.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  मिथून: राजकीय क्षेत्रात असाल तर विराधकांना सडेतोड उत्तरे द्याल. मृदू वाणीने आज अवघड कामे सोपी होतील. मोहास बळी पडण्याचे प्रसंग येतील पण ते टाळा. शुभ रंग : डाळिंबी, अंक-५.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  कर्क : खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. अचानकपणे दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. उच्चशिक्षणार्थींना विदेश- वारीची स्वप्ने पडतील. आरोग्यास जपा. शुभ रंग : भगवा, अंक-१.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  सिंह: आज कार्यक्षेत्रात तुमच्या अचूक कार्यपध्दतीचे कौतुक होईल. नव्याने सुरु केलेले काही उपक्रम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतील. मित्र तुमचे गोडवे गातील. शुभ रंग : मोतिया, अंक-२.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  कन्या : राजकारणात प्रभावी नेतृत्व कराल. वादविवादात अग्रेसर असाल. रिकामटेकडया मित्रांसाठी आज वेळ देऊ नका. टाईम इज मनी या धोरणाने वागा. शुभ रंग : सोनेरी, अंक-४.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  तूळ : आज कुणाकडून कसलीच अपेक्षा ठेऊ नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. मन प्रसन्न ठेवण्यासाठी भक्तिमार्गा सारखा दुसरा योग्य मार्ग नाही. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-६.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  वृश्चिक : अवजड कामे करणाऱ्यांनी सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे. आज कोणतेही धाडसी निर्णय विचारांती घ्यावेत. घरातील थोर मंडळींशी वैचारीक मतभेद संभवतात. शुभ रंग : हिरवा, अंक-९.
   
 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  धनू : व्यवसाय विस्तारासाठी नव्या योजना आखाल. भागिदारांमधे सलोखा राहील. आज जोडीदाराचीही खंबीर साथ असताना अपयशाची भीती बाळगू नका. शुभ रंग : पांढरा, अंक-३.
   
 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  मकर: कार्यक्षेत्रात स्विकारलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. आज वादविवादात आपले घोडे पुढे दामटवता येईल. आज तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. शुभ रंग : जांभळा, अंक-८.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  कुंभ: कलाक्रिडा क्षेत्रातील मंडळींच्या कामाचे कौतुक होईल. काही हौशी मंडळी सहलींचे आयोजन करतील. महीला सौंदर्याची काळजी घेतील. शुभ रंग : केशरी, अंक-७.

 • Tuesday 2January 2018 Free Daily Horoscope In Marathi

  मीन: काही घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. कुटुंबियांची मने जपण्याचा आज तुमचा प्रयत्न असेल. आज आईचे मन दुखाऊ नका. व्यर्थ वाद टाळा. शुभ रंग : पिवळा, अंक-३.
   
Trending