आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्भाग्य आणि गरिबीचे कारण बनू शकते नळातून टपकणारे पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे, कारण पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ट भट्ट यांच्यानुसार, धर्म ग्रंथांमध्ये पाण्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तू शास्त्रामध्ये पाण्याचा दुरुपयोग गरिबीचे कारण सांगण्यात आला आहे. ज्या घरामध्ये पाण्याच्या चुकीच्या पद्धतीने वापर होतो तेथे देवी लक्ष्मी वास्तव्य करत नाही. येथे जाणून घ्या, पाण्याशी संबंधित इतर काही खास गोष्टी.


1. वास्तू शास्त्रानुसार, ज्या घरांमध्ये नळाचे व्यर्थ पाणी टपकत राहते, त्या घरात नेहमी धनाचा अभाव राहतो. नळातून व्यर्थ टपकत राहणाऱ्या पाण्याचे आवाजाने घराचे आभामंडळ प्रभावित होते. यामुळे घरातील सर्व नळ व्यवस्थित बंद करून ठेवावेत आणि खराब नाळ दुरुस्त करून घ्यावेत.


2. अनेक लोकांना रात्री स्नान करण्याची सवय असते. परंतु शास्त्रामध्ये रात्री स्नान करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. म्हणजेच या वेळी स्नान करू नये.


निशायां चैव न स्नाचात्सन्ध्यायां ग्रहणं विना


अर्थात- रात्री स्नान करू नये. ज्या दिवशी ग्रहण असेल त्या दिवशीच रात्री स्नान करणे योग्य राहते. रात्रीच्या वेळी स्नान करणे पाण्याचा दुरुपयोग करण्यासारखे आहे. जो व्यक्ती पाण्याचा अशाप्रकारे दुरुपयोग करतो, त्याच्या घरात नेहमी धनाचा अभाव राहतो.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, पाण्याशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...