घराच्या दक्षिण दिशेला / घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही ठेवू नयेत या 3 वस्तू, अन्यथा वाढू शकतात समस्या

Jul 31,2018 12:03:00 PM IST

वास्तू शास्त्रानुसार, एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवली असल्यास याच्या अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे वास्तुदोष वाढतात आणि धन संबंधित कामामध्ये बाधा निर्माण होतात. सर्व दिशांचे वेगवेगळे महत्त्व आहे. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या दक्षिण दिशेला कोणकोणत्या वस्तू ठेवू नयेत...


पहिली वस्तू आहे घड्याळ...
दक्षिण दिशा यमदेवाची मानली जाते म्हणजेच काळाची दिशा. या दिशेला काळ म्हणजे वेळ दाखवणारी घड्याळ ठेवू नये. ये दिशेला घडल्यास असल्यास घरामध्ये आजार राहतात. कोणत्याही आजारावर औषध प्रभावी ठरत नाही.


दुसरी वस्तू आहे तिजोरी
पैसे ठेवण्यासाठी दक्षिण दिशा शुभ मानली जात नाही. पैसे ठेवण्यासाठी सर्वात श्रेष्ठ दिशा उत्तर आहे. दक्षिण दिशेला पैसा ठेवल्यास घरात बरकत राहत नाही. खर्च जास्त होतोत आणि सेव्हिंगही नष्ट होते.


तिसरी वस्तू आहे आरसा
या दिशेला आरसा ठेवल्याने येथील नकारात्मक उर्जेला जास्त बळ मिळते. या दिशेला आरसा असल्यास काम झाल्यानंतर यावर पडदा टाकून ठेवावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दक्षिण दिशेचे दोष दूर करण्याचे उपाय...

> दक्षिण दिशेचे दोष दूर करण्यासाठी येथे ऍक्वेरियम ठेवावे. यामध्ये गोल्डन रंगाचा मासा अवश्य असावा. याच्या शुभ प्रभावाने वास्तुदोष दूर होऊ शकतात. > दक्षिण दिशेला स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. या ठिकाणी कधीही कचरा जमा होऊ देऊ नये.> या दिशेला एका वाटीत मीठ भरून ठेवावे. मिठामध्ये नकारात्मकता ग्रहण करण्याची शक्ती असते. यामुळे दक्षिण दिशेचा वाईट प्रभाव नष्ट होऊ शकतो.
X