आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्भाग्याचे कारण बनू शकते घरामध्ये ठेवलेले बंद आणि फुटके घड्याळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक घरामध्ये भिंतीवर लावलेले घड्याळ जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. घड्याळ केवळ वेळ सांगण्याचेच काम करत नाही तर चांगला काळ वाढवण्याचे कामही करते. वास्तुशास्त्रामध्ये घड्याळ आणि समयसूचक वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे. यामुळे जीवनातील शुभता वाढते. येथे जाणून घ्या, या संदर्भातील विशेष माहिती...


घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर लावू नये घड्याळ -
वास्तुनुसार घराची दक्षिण दिशा यमाची दिशा आहे. या दिशेला घड्याळ ठेवल्यास प्रगतीचा वेग मंद होऊ शकतो. तसेच ही दिशा घरातील मुख्य व्यक्तीची असते. यामुळे घरातील मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर प्रभाव पडू शकतो. फेंगशुई शास्त्रामध्येसुद्धा दक्षिण दिशेला घड्याळ लावणे शुभ मानले जात नाही. वैज्ञानिक शोधानुसार या दिशेने नकारात्मक उर्जा प्रवाहित होते. या दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार या दिशेकडे लक्ष जाईल, यामुळे वारंवार नकारत्मक उर्जेचा तुमच्यावर प्रभाव पडू शकतो.


घराच्या दरवाजावरही लावू नये घड्याळ
फेंगशुई शास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या वरील भागात घड्याळ लावणे शुभ मानले जात नाही. असे केल्यास घरातील तणाव वाढू शकतो. यामुळे घरातून आत-बाहेर जाताना जवळपासची उर्जा प्रभावित होऊ शकते. घर दक्षिणमुखी असेल तर या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे.


घरामध्ये ठेवू नये बंद घड्याळ -
बंद पडलेली घड्याळ घरामध्ये ठेवल्यास सकारात्मक उर्जेचा स्तर घटतो आणि नकारात्मक उर्जा वाढते. याच कारणामुळे घरामध्ये बंद, तुटलेले घड्याळ व इतर व्यर्थ सामान ठेवू नये. किंवा बंद, बिघडलेले घड्याळ दुरुस्त करून चालू करावे. घरामध्ये मधुर ध्वनी उत्पन्न करणारे घड्याळ लावावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घड्याळाशी संबंधित इतर सहा गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...