आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनमध्ये केलेल्या या चुकांमुळे वाढतो वास्तुदोष, कायम राहते आर्थिक तंगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किचन घरातील सर्वात खास जागांमधील एक जागा आहे. कारण याच जागेशी घराचा वास्तू आणि सदस्यांचे आरोग्य निगडीत आहे. किचन संदर्भात विविध गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरातील सर्व अशुभ प्रभाव नष्ट केले जाऊ शकतात.


1. किचनमध्ये देवघर बनवणे शुभ मानले जात नाही. ज्या घरातील किचनमध्ये देवघर असते, तेथे राहणारे तापट, गरम डोक्याचे होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याला रक्ताशी संबंधित आजाराला सामोरे जावे लागू शकते.


2. ज्या घरात किचनमध्ये स्टोअर रूम असेल तेथील गृहस्वामीला नोकरी किंवा व्यापारात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या त्रासापासून दूर राहण्यासाठी किचन आणि स्टोअर रूम वेगवेगळे बांधावे.


3. किचन आणि बाथरूम एकाच रेषेत जवळजवळ असणे शुभ मानले जात नाही. अशा घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना आयुष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही ठीक राहत नाही. अशा घरातील मुलींच्याआयुष्यात अशांती राहते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, किचनशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...