Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Vastu Tips For Temple In Home

घरात जागा कमी असल्यास कुठे बनवावे देवघर? ज्यामुळे सर्व देवता होतील प्रसन्न

रिलिजन डेस्क | Update - Jul 26, 2018, 12:02 AM IST

पूजा-पाठ करताना वास्तूच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास देवतांची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते.

 • Vastu Tips For Temple In Home

  पूजा-पाठ करताना वास्तूच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास देवतांची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार घरामध्ये देवघर असल्यास सुख-शांती आणि समृद्धी कायम राहते. देवघर वास्तुनुसार बनवले असल्यास शुभफळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, देवघराशी संबंधित काही खास गोष्टी...


  1. तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. या दिशेला पूजा केल्याने देवी-देवता लवकर प्रसन्न होतात. देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते.


  2. देवघरात जास्त मोठ्या मूर्ती (प्रतिमा) नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. इतर देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत.


  3. घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.


  4. घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पुजेशी संबंधित सामानच ठेवावे.


  5. घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे. जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तेथे थोडीशी एका व्यक्तीला बसत येईल एवढी तरी जागा मोकळी सोडावी.


  6. घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.


  7. पूजेमध्ये शिळे, सुकलेले फुल-पान अर्पण करू नये. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा. या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही. त्यामुळे यांचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो. इतर सामग्री ताजीच असावी. एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झाले असेल तर देवाला अर्पण करू नये.


  8. दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघर पडदा टाकून झाकावे. ज्याप्रकारे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही, ठीक त्याच भावनेने मंदिरावर पडदा टाकावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • Vastu Tips For Temple In Home

  9. वर्षभरात जेव्हाही श्रेष्ठ मुहूर्त येतात, तेव्हा संपूर्ण घरामध्ये गोमुत्र शिंपडावे. गोमुत्र शिंपडल्याने पवित्रता कायम राहते आणि वातावरण सकारात्मक बनते. शास्त्रानुसार गोमुत्र अत्यंत चमत्कारिक प्रभाव टाकते आणि या उपायाने दैवी शक्तीची विशेष कृपा राहते.

 • Vastu Tips For Temple In Home

  10. घरामध्ये पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघरचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

Trending