आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय तृतीयेला 11 वर्षांनंतर महामंगल योग, हे आहेत शुभ मुहूर्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाख मासातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया म्हटले जाते. हिंदू धर्मानुसार या दिवशी केले गेलेले शुभ कार्य, दान, उपवास आणि व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होते. यामुळे या तिथीला अक्षय (संपूर्ण) तृतीय म्हटले जाते. या वर्षी अक्षय तृतीया 21 एप्रिल, मंगळवारी आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.

11 वर्षांनंतर जुळून येत आहे महामंगल योग -
उज्जैनचे पंचांगकर्ता व ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी अक्षय तृतीयेला 11 वर्षांनंतर महामंगल योग जुळून येत आहे. 21 एप्रिलला सूर्य मेष, चंद्र वृषभ आणि गुरु कर्क राशीमध्ये असल्यामुळे मंगलकारी योग जुळून येत आहेत. या दिवशी दुपारी 11.59 पर्यंत कृतिका आणि त्यानंतर रोहिणी नक्षत्र राहील. चंद्र उच्च राशीत असल्यामुळे हे दोन्ही नक्षत्र सर्वप्रकारे शुभ कार्यामधील शुभता वाढवतील. या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि सौभाग्य योग खरेदीसाठी शुभ राहतील. यापूर्वी 2004 मध्ये असा योग जुळून आला होता.

अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त
सकाळी 09.07 ते 10.35 पर्यंत - चर
सकाळी 10.35 ते दुपारी 12.09 तक - लाभ
दुपारी 12.09 ते 01.31 पर्यंत - अमृत
रात्री 08.15 ते 09.44 पर्यंत - लाभ

अक्षय तृतीयेला राशीनुसार काय खरेदी करणे शुभ राहील, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...