आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्रवारसाठी ज्योतिष शास्त्रातील 5 छोटे-छोटे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा प्राप्त होत नाहीत. तसेच वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्र ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी शुक्रवारी विशेष उपाय केले जातात. शास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीचेसुद्धा उपाय केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, छोटे-छोटे पाच उपाय...

1. प्रत्येक शुक्रवारी शिवलिंगावर दुध आणि जल अर्पण करा. तसेच ऊँ नम: शिवाय मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करा. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करावा.
2. एखाद्या गरीब व्यक्तीला गायीचे दुध दान करा.
3. शुक्रवारी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सौभाग्याच्या वस्तू दान करा. सौभाग्याच्या वस्तू म्हणजे उदा. हिरव्या बांगड्या, लाल साडी, कुंकू इ. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.
4. शुक्र ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी शुक्र मंत्राचा जप करावा. मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असावी. शुक्र मंत्र: द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:।
5. शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी पुढील वस्तूंचे दान करू शकता. चांदी, तांदूळ, पांढरे वस्त्र, दही, चंदन.
बातम्या आणखी आहेत...