आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कोणत्या राशींना असेल शनीची साडेसाती, हे आहेत छोटे-छोटे उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिदेव आता वृश्चिक राशीत आले आहेत. यामुळे शनीची साडेसाती आणि अडीचकी(अडीच वर्ष शनीचा प्रभाव)ची स्थिती बदलली आहे. शनि एका राशीमध्ये जवळपास अडीचवर्ष राहतो. येथे जाणून घ्या, कोणत्या राशींवर शनीची साडेसाती आणि अडीचकीचा प्रभाव राहील तसेच शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात....

कन्या रास -
या राशीला आता शनीच्या साडेसातीपासून आराम मिळेल, कारण कन्या राशीची साडेसाती पूर्णपणे समाप्त झाली आहे. मागील काळामध्ये अपूर्ण राहिलेले काम आता पूर्ण होईल. या लोकांनी हनुमान चालीसाचे पाठ करावेत. या उपायाने सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होईल.

तूळ रास -
तूळ राशीचा साडेसातीचे शेवटचे चरण सुरु असून आणखी अडीचवर्ष शनीचा प्रभाव या राशीवर राहील. ज्योतिष शास्त्रानुसार साडेसातीच्या शेवटच्या चरणात व्यक्तीला विविध शुभफळ प्राप्त होतात. शनिदेव याच काळात प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ प्रदान करतात. शनीचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता...

- काळे कपडे, काळी गाय, लोखंडाचे भांडे दान करा. शनिदेव प्रसन्न होतील.
- प्रत्येक शनिवारी ऊँ शं शनैश्चराय नम: या मंत्राचा कामीं कमी 108 वेळेस जप करा.

पुढे जाणून घ्या आणखी किती राशींवर शनीच्या साडेसाती आणि अडीचकीचा प्रभाव राहील.....