आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Astrological Prediction Of Maharashtra Politicians In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्तृत्वाला पावती की नशीबावर लागणार बाजी...वाचा प्रमुख नेत्यांची भविष्यवाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख दोन दिवसांवर आली आहे. असे असतानाही अद्याप युती आणि आघाड्यांचे भविष्य टांगणीला लागलेले आहे. मरगळलेल्या राजकीय वातावरणात सर्व पक्ष आपली ताकद आजमावणार की, पुन्हा एकमेकांच्या हातात हात घालून समोर येणार, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण आजच्या घडीला या नेत्यांची ग्रहदशा काय सांगते, आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी असेल याबाबत आज माहिती देत आहोत.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी हे भविष्य वर्तवलेले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार यांच्या जन्मतारखेवरून त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करून विधानसभा निवडणुकीत कोणाची वाटचाल कशी असेल, यासंदर्भात भाकीत वर्तवलेले आहे.

शरद पवार -
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सध्या शनीची महादशा सुरू आहे. त्यांच्या कुंडलीत शनि सध्या नीचेचा असून राहूचे अंतर आहे. राहू कन्या राशीचा असून सध्या कन्या राशीतच गोचर करत आहे. ही ग्रहस्थिती निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्यासाठी व्यक्तिगत स्वरुपात चांगली ठरू शकते, परंतु पक्षाला हे स्वतःच्या बळावर जास्त मोठे यश मिळवून देऊ शकणार नाहीत. नोव्हेंबरमध्ये शनि आपल्या उच्च तूळ राशीतून मंगळाच्या वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. ही ग्रहस्थितीसुद्धा शरद पवार यांच्यासाठी भविष्याचे चांगले संकेत देत नाही. वर्तमानात गुरु उच्च राशीत असल्यामुळे त्यांना जनमताचा कौल मिळेल की नाही यामध्ये शंका आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कसे असतील इतर नेत्याचे ग्रहतारे...