आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी : पुरोहिताकडून पुजा करणे शक्य नसल्यास कालसर्पसाठी करा हे छोटे-छोटे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण मासातील शुक्ल पक्ष पंचमी तिथीचे स्वामी नागदेवता आहेत. यामुळे या पंचमीला नागपंचमी म्हटले जाते. गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये नागाच्या अनंत, पक्षक, वासुकी, कर्कोटक आणि पिंगल स्वरूपाच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची पूजा करावी.

ज्योतिष शास्त्रानुसार नागपंचमी तिथी कालसर्प दोष मुक्तीसाठी विशेष मानण्यात आली आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास कालसर्प दोषाची शांती होते आणि जीवनातील सर्व बाधा दूर होतात.

- वाहत्या पाण्यामध्ये पांढरे फुल, दुध आणि बत्ताशे प्रवाहित करावे. या उपायाने कालसर्प दोषाची शांती होते. हा विधी सूर्यास्तापूर्वी एखाद्या नदीकिनारी करावा.

- नागपंचमीच्या दिवशी सव्वा किलो धन्य पक्षांना टाकावे.

- नागपंचमीच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी यथाशक्ती गरिबांना अन्नदान करावे.

- आजच्या शुभ मुहूर्तावर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अष्टधातू किंवा चांदीचे स्वस्तिक लावावे. या स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूला धातू निर्मित नाग लावावे.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कालसर्प दोष शांतीचे इतर काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)