आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 सप्टेंबर राशीभविष्य : सूर्य-चंद्रावर असेल राहू-केतूचा प्रभाव, वाचा कसा असेल दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी सूर्य आणि द्र दोन्हींवर राहू-केतूचा परिणाम असणार आहे. या ग्रहस्थितीमुळे ग्रहण आणि व्यघात नावाचा अशुभ योग तयार होत आहे. त्यामुळे काही जणांना दिवसभर सांभाळून राहावे लागणार आहे. आज कोणत्याही कामात घाई करू नका आणि खोटे बोलू नका. या योगामध्ये उधार दिलेले पैसे मिळण्याची शक्यता कमीच असते.

सूर्य कन्या राशीत बुध आणि राहूबरोबर आहे तर चंद्र केतू मीन राशीत आहे. चंद्रावर शत्रूग्रह बुधाची नजर आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. या योगात कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करू नये. त्याचा विशेष प्रभाव मेष, वृषभ, तुळ आणि वृश्चिक या राशींवर पडणार आहे. या राशींशिवाय इतर राशींच्या लोकांनाही समस्या निर्माण होतील. मोठे व्यव्हार करणे टाळायला हवे. राशी आणि जन्मकुंडलीच्या ग्रहांवरील प्रभावामुळे काही लोकांवर अशुभ योगाचा परिणाम जास्त असेल तर काही जणांवर हा परिणाम कमी असेल.

मंगळवारची ग्रहस्थिती
सूर्य - कन्या राशीत
चंद्र - मीन राशीत
मंगळ - सिंह राशीत
बुध - कन्या राशीत
गुरू - सिंह राशीत
शुक्र - कर्क राशीत
शनि - वृश्चिक राशीत
राहू - कन्या राशीत
केतू - मीन राशीत

पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 राशींचे राशीफळ...