उज्जैन - आज 2 नोव्हेंबर तुळा राशित शनिचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शनि तुळा रशितून दुस-या रशित प्रवेश करणार आहे. शनिच्या राशि बदलण्यामुळे ब-याच ठिकाणी पंचांग भेदानुसार वेगवेगळ्या तिथि सांगण्यात आल्या आहेत. मागील दीड वर्षांपासून शनि तुळ राशित आहे.
आज चंद्र कुंभ राशित आहे म्हणजेच शनिच्या राशित आहे. शनिची राशि चंद्र आज राक्षस नावाचा अशुभ योग तयार करत आहे. हा अशुभ योग संपूर्ण दिवस राहणार आहे. यामुळे काही राशिच्या व्यक्तींना त्रासाचा सामना करावा लागू शकतो. याशिवा आज सूर्य आणि चंद्राची स्थितिमुळे ध्रुव नावाचा शुभ योग तयार होत आहे. या शुभ योगामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे.
रविवार ग्रह स्थिति-
सूर्य - तुळा राशिमध्ये
चंद्र - कुंभ राशिमध्ये
मंगळ- धनु राशिमध्ये
बुध - कन्या राशिमध्ये
गुरु - कर्क राशिमध्ये
शुक्र - तुला राशिमध्ये
शनि - तुला राशिमध्ये
राहु - कन्या राशिमध्ये
केतु - मीन राशिमध्ये