आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : मीन राशीमध्ये तीन ग्रह; वाचा, कसा राहील सोमवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज मीन राशीमध्ये शुक्र, मंगळ आणि केतुसोबत आहे. हे तीन ग्रह कोणत्या न कोणत्या प्रकारच मोठी उलथापालथ करू शकतात. या तिन्ही ग्रहांवर राहूची पूर्ण दृष्टी राहील. मंगळ आणि राहूचा दृष्टी संबंध अंगारक योग तयार करत आहे. शुक्र आणि मंगळ एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह एकत्र असल्यामे कामे अपूर्ण राहतात किंवा कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. शुक्र शत्रू राशीत असल्यामुळे अशुभ फळ देईल.

या व्यतिरिक्त चंद्र पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रामध्ये असल्यामुळे आणखी दोन अशुभ योग जुळून येत आहेत. सोमवारी पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे उत्पात नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा योग सकाळी 11.50 पर्यंत राहील. त्यानंतर चंद्र उत्तराषाढा नक्षत्रामध्ये गेल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग जुळून येईल. सोमवारच्या शुभ-अशुभ ग्रहस्थितीमुळे या योगांचा प्रभाव कोणावर कमी तर कोणावर जास्त राहील.

सोमवारचे संपूर्ण राशिभविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....