आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य: आज चंद्रावर शनि-मंगळाची नजर, जाणून घ्या कसा असेल गुरुवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्र त्याच्या उच्च राशीत असणार असून वृषभ राशीच्या चंद्रावर शनिची पूर्ण नजर असणार आहे. आज चंद्र आणि शनि एकमेकांच्या समोर आहेत. या ग्रह स्थितीमुळे विषयोग तयार होणार आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे काही व्यक्तींना मानसिक त्रासाचा सामना करावा लागेल. तर काही जणांना धनहानी होण्याची शक्यता आहे. आज चंद्र कृतिका नक्षत्रासोबत लुंबक नावाचा अशुभ योग तयार करणार आहे. तयार होणार हा अशुभ योग पूर्ण दिवस राहणार असून याच्या प्रभावामुळे काही व्यक्तींची चिडचिड होईल.
याशिवाय आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे ब्रह्म योग तयार होणार आहे. या योगामुळे काही व्यक्तींसाठी आजचा गुरुवार भाग्यशाली राहणार आहे. संपूर्ण दिवस असणा-या या योगाच्या प्रभावामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. मंगळाची चौथी दृष्टि उच्च राशीच्या चंद्रावर असल्याने धनलाभ होण्याचे योग राहणार आहेत. हा योगदेखील पूर्ण दिवस राहणार असल्याने काही व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असेल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, शनि आणि चंद्राचा प्रभाव कसा असेल तुमच्यासाठी -