आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुवारचे शेड्युल ठरवण्यात तुम्हाला मदत करू शकते हे राशीफळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारच्या ग्रह स्थितीमुळे दोन शुभ आणि दोन अशुभ योग जुळून येत आहेत. आज दिवसभर चंद्र सिंह राशीमध्ये राहील. चंद्रावर शनि, मंगळ आणि शुक्राची दृष्टी राहील. शनीच्या वक्रदृष्टीमुळे आज विषयोग जुळून येत आहे. हा अशुभ योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने धनहानी आणि वाद होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मघा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे मुसळ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. चंद्र रात्री 11 वाजेपर्यंत या नक्षत्रामध्ये राहील. आजची अशुभ ग्रहस्थिती पाहता तुम्ही तुमच्या शेड्युलमध्ये काहीसा बदल करू शकता. आज काही कामे करावीत तर काही टाळावीत.

या दोन अशुभ योगांसोबतच आज दोन शुभ योग जुळून येत आहेत. मकर राशीचा सूर्य आणि सिंह राशीतील चंद्र आज शोभन नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या योगाच्या प्रभावाने अडकलेला पैसा परत मिळेल. आज चंद्रावर मंगळाची पूर्ण दृष्टी असल्यामुळे लक्ष्मी नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. चंद्र आणि मंगळ मित्र ग्रह आहेत. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने अचानक धनलाभ होऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचे हे योग तुमच्यासाठी कसे राहतील...