आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्यासाठी किती सकारात्मक राहील मंगळवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी रात्रीपासून चंद्र तूळ राशीत आला आहे. आता चंद्रावर राहूचा प्रभाव राहणार नाही. यापूर्वी चंद्रावर राहूचा प्रभाव होता आणि ग्रहण योग जुळून आला होता. ग्रहण योगामुळे काही लोकांची कामे अपूर्ण राहिली. धनहानी झाली आणि वादही सुरु झाले. आता हे अशुभ योग समाप्त झाल्यामुळे काही लोकांसाठी सकारात्मक काळ सुरु होत आहे. तूळ राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे मंगळवारी दिवसभर ध्वज नावाचा शुभ योग राहील. या योगाच्या प्रभावाने ठरवलेली कामे पूर्ण होतील. धनलाभाचे योग जुळून येतील. शुभ योगाच्या प्रभावाने आजचा दिवस चांगला राहील आणि सर्व कामे पूर्ण होतील.

या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नसेल त्यांच्यासाठी हा योग जास्त त्रासदायक ठरू शकतो. या योगाच्या प्रभावाने मानसिक तणाव आणि धनहानी होऊ शकते. आज काही लोक या योगाच्या प्रभावाने वादामध्ये अडकू शकतात.

मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या
तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन

राशिभविष्य वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा किंवा स्वतःच्या राशीवर क्लिक करा...