या आठवड्यातील मंगळवारी गोचरमध्ये मंगळ स्वतःची जागा बदलत आहे. मंगळ कर्केतून सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्य पण कन्या राशीत प्रवेश करत आहे. मंगळ-गुरूच्या युतीमुळे सिंह राशीला बळ मिळणार आहे. याच कारणामुळे ज्योतिषीय दृष्टीकोनातून देशासाठी हा आठवडा मंगळवारपासून शुभ आहे.
मेष
गुरू पाचव्या स्थानी आणि मंगळही पंचम स्थानात असल्याने राशीला बळ प्राप्त होईल. जमिनीच्या व्यवहारांतून लाभ मिळेल. आिर्थक प्राप्ती चांगली राहील. शासनाच्या योजनांचे लाभ होतील. या आठवड्यात परदेशवारीची इच्छा पूर्ण होऊ शकते. वाहनांपासून सावध राहा. वादांपासून दूर राहणे चांगले.
नोकरी-व्यवसाय : व्यवसाय वाढेल, नोकरीत बढतीचे योग.
शिक्षण : वर्गात आपली कामगिरी उठावदार होईल, विद्यार्थ्यांमध्ये आपले कौतुक होईल.
आरोग्य : तोंडातील चट्टे त्रासदायक ठरू शकतात. जखम होण्याची शक्यता.
प्रेम : साथीदाराकडून निराशा, जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल.
व्रत: श्रीगणेशाला खिरीचा नैवेद्य दाखवा.
पुढील स्लाईड्सवर उज्जैनचे पंडित मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी हा आठवडा कसा राहील...