आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीचे राशीफळ : जुळून येणार शुभ योग, कोणाला होणार धनलाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 नोव्हेंबर, बुधवार म्हणजे दिवाळीला या वर्षी एक नाही तर अनेक विशेष योग जुळून येत आहेत. हे योग जनसामान्यांना शुभफळ देणारे राहतील. या वर्षी दिवाळीचा सण सौभाग्य आणि धाता योगामध्ये साजरा केला जाईल. या योगामध्ये करण्यात आलेली लक्ष्मी पूजा सुख-समृद्धी, धन-वैभव प्रदान करणारा राहील. दिवाळीची पूजा विशाखा नक्षत्रामध्ये होईल आणि याचे स्वामी गुरु आहेत.

गुरु सध्या सिंह राशीमध्ये स्थित असल्यामुळे देशासाठीसुद्धा ही दिवाळी महत्त्वपूर्ण राहील. सगळीकडे आनंदाचे वातावरण राहील आणि व्यापारात प्रगतीचे योग जुळून येतील. दिवाळीला कोणकोणते योग जुळून येत आहेत, याची माहिती खालीलप्रमाणे आहे...

131 वर्षांनंतर जुळून येणार गुरु-राहू योग
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, या वर्षी दिवाळीला गुरु सिंह राशीत आणि राहू कन्या राशीत राहील. हा योग यापूर्वी 1884 मध्ये जुळून आला होता. यानंतर हा योग आता पुन्हा 131 वर्षांनंतर वर्ष 2145 मध्ये जुळून येईल. पं. शर्मा यांच्यानुसार गुरु सिंह राशीमध्ये आणि राहू कन्या राशीमध्ये असल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी करण्यात आलेल्या उपायांमध्ये यश मिळेल. राहूच्या शुभ स्थितीमुळे या काळात करण्यात आलेल्या तांत्रिक प्रयोगामध्ये यश मिळेल.

या योगांमुळे होईल लाभ
उज्जैनचे पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या वर्षी दिवाळीला सौभाग्य, बुधादित्य व धाता योग जुळून येत आहे. हे तिन्ही योग खूप विशेष आहेत. या योगामध्ये करण्यात आलेल्या लक्ष्मी पूजेने सर्वप्रकारच्या सुखांची प्राप्ती शक्य आहे. हे योग धनलाभासाठी खूप शुभ मानण्यात आले आहेत. धान्य, किराणा, धातू आणि राजकारणी लोकांसाठी हे योग खूप खास राहतील.

दिवाळीचे राशीफळ (पं. मनीष शर्मा यांच्यानुसार) जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...