आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1980 नंतर सोमवारी जुळून आला हा महायोग, करू शकता हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 मे, सोमवारी वैशाख मासातील पैर्णिमा अत्यंत खास आहे, कारण या दिवशी 5 पेक्षा जास्त शुभ योग जुळून येत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार असा योग 35 वर्षानंतर जुळून येत आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून स्नान व दान करण्याचे महत्त्व आहे.

हा आहे शुभ योग -
उज्जैनचे पंचांगकर्ता व ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांच्यानुसार या वर्षी वैशाख पौर्णिमेला सोमवार, स्वाती नक्षत्र, तूळ राशीतील चंद्र, व्यतिपात योग आणि मेष राशीतील सूर्य राहील. वैशाख पौर्णिमेला हा योग यापूर्वी 1980 मध्ये जुळून आला होता आणि पुढे 13 वर्षांनतर 8 मे 2028 मध्ये जुळून येईल. हे योग, वार, तिथी आणि नक्षत्र सर्व शुभफळ प्रदान करणारे आहेत. या दिवशी विधीपूर्वक पवित्र नदीमध्ये स्नान करून गरजूंना दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते.

करू शकता हे उपाय
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये पारद (एक प्रकारचा विशेष धातू) हनुमानाची मूर्ती स्थापन करावी. पारदला रसराज म्हटले जाते. तंत्र शास्त्रानुसार पारद हनुमान मूर्तीची पूजा केल्याने सर्व अर्पूर्ण कामे पूर्ण होतात. ही मूर्ती घरात ठेवल्याने सर्वप्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात तसेच घरातील वातावरण शुद्ध होते. जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याने दररोज पारद हनुमान मूर्तीची उपासना करावी.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...