आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनलाभ व सुखी जीवनासाठी करू शकता हे सोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणती न कोणती अडचण अवश्य असते. आज आम्ही तुम्हला जीवनातील विविध समस्यांवर काही सोपे ज्योतिषीय उपाय सांगत आहोत.

धनलाभ...
एखाद्या शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून आणा आणि त्यावर पांढऱ्या चंदनाने गायत्री मंत्र लिहून त्याची पूजा करा. पूजा झाल्यानंतर हे पान तिजोरी, गल्ला, कॅश बॉक्स किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तेथे कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवा. हे पिंपळाचे पान प्रत्येक शनिवारी बदलत राहा. या उपायाने घरामध्ये सुख-शांती येईल आणि धन-संपत्ती वाढण्याचे योग जुळून येतील.

सुखी कौटुंबिक जीवनासाठी...
1. घरामध्ये नेहमी अशांती आणि कलहाचे वातावरण असेल तर मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूने श्वेतार्क गणेश मूर्ती लावल्यास घरात सुख-शांती राहील.
2. दररोज सकाळी घरामध्ये गोमुत्र किंवा गायीच्या दुधात गंगाजल मिसळून शिंपडल्यास घराची शुद्धी होते आणि नकारात्मक उर्जा नष्ट होण्यास मदत होते.
3. गायीच्या शेणापासून दिवा तयार करून त्यामध्ये तेल व गुळ टाकून दिवा लावावा. या उपायाने घरामध्ये शांतता राहील तसेच समृद्धीमध्ये वृद्धी होईल.

इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...