आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

110 वर्षांमध्ये जेव्हा-जेव्हा तयार झाले आहेत हे योग, आला आहे विनाशकारी भूकंप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 एप्रिल 2015 रोजी नेपाळला मोठ्या तीव्रतेच्या भूकंपाने हादरवून टाकले. या भुकंपाच्या झटक्याने काठमांडू आणि इतर आजूबाजूच्या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने ज्यावेळी हा भूकंप आला त्यावेळी पुनर्वसु नक्षत्र सुरू होते. या नक्षत्राचा स्वामी गुरु असून सध्या गुरु कर्क राशीमध्ये उच्च स्थानी आहे. मंगळ त्याच्या स्वत:च्या राशीमध्ये म्हणजे मेषमध्ये आहे. शनि-मंगळाचे स्वामित्व असणारी रास वृश्चिकमध्ये गोचर होत आहे.
मंगळाची पूर्ण अष्टम दृष्टि शनिवर पडत आहे. मंगळाची चतुर्थ पूर्ण दृष्टि गुरुवर आहे. सूर्य आणि मंगळासोबत मेष राशीमध्ये युती बनवलेली आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्याअनुसार याच योगांमुळे 1905 ते 2015 पर्यंत म्हणजे 110 वर्ष भूकंप आले आहेत. 1905 मध्ये हिमाचल प्रदेशात भूकंप आला होता.
या ग्रहांच्या योगांमुळे येऊ शकतो भूकंप
1. पं. शर्मा यांनी सांगितले की, जेव्हा-जेव्हा भारत अथवा भारताच्या आजूबाजूला असलेल्या देशांमध्ये भूकंप आला आहे त्यावेळी मंगळ आणि शनीची एकमेकांवर परस्पर दृष्टि राहिली आहे. शनि-मंगळामुळेच भूकंपाचे योग तयार होतात असे ते म्हणाले.
2. ज्या दिवशी सूर्य, मंगळ, शनि अथवा गुरुचे नक्षत्र असते अथवा या दिवशी जर मंगळाची किंवा शनि अथवा शनिची मंगळावर दृष्टि असेल, किंवा सूर्याची मंगळावर अथवा गुरु, मंगळाची सूर्यावर परस्पर दृष्टि असल्यास भूकंप येण्याची दाट शक्यता असते. 25 एप्रिल 2015 रोजी देखील अशाच प्रकारचा योग तयार झाला होता.
3. भूकंप येण्याचे एक मुख्य कारण ग्रहण देखील आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 20 मार्च आणि 4 एप्रिल 2015 रोजी सूर्य आणि चंद्र ग्रहण झाले होते. जेव्हा-जेव्हा अशा प्रकारचे दोन ग्रहण सोबत आले आहेत त्यावेळी भूकंपाची स्थिती निर्माण झाली आहे. याआधी देखील याचा अनुभव आला आहे.
4. अमावस्या अथवा पोर्णिमेच्या तिथीच्या जवळपास भूकंप येण्याची शक्यता अधिक असते.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, याआधी कधी-कधी अशा प्रकारचे योग तयार झाले आहेत आणि भूकंप आला आहे...