आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंप येण्याच्या काही दिवस आधीच निसर्ग आणि गाय देतात हे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज 12 मे 2015, मंगळवारी दुपारी जवळपास 12 वाजून 38 मिनिटांनी दिल्ली-एनसीआरसहित उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड, पंजाबमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाचे केंद्र नेपाळ-चीन सीमेवर असल्याचे सांगण्यात येत आहें. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.4 सांगण्यात आली आहे. यापूर्वी 25 एप्रिल 2015 रोजी नेपाळमध्ये 7.9 तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपामध्ये नेपाळ उद्ध्वस्त झाले होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी भूकंपाशी संबंधित ज्योतिष शास्त्रातील काही खास संकेत सांगितले आहेत. या संकेतांवरून काही दिवसांपूर्वीच भविष्यात भूकंप केव्हा होणार याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

भृगुसंहिता (ज्योतिषाचा प्रमुख ग्रंथ) नुसार
भूकंपाशी संबंधित गायीचे संकेत -

1. जर गाय सलग एक आठवडाभर विनाकारण आपल्या निर्धारित क्षमतेपेक्षा दुध देत असेल तर हा भूकंपाचा संकेत समजावा. अशा स्थितीमध्ये एखाद्या ठिकाणी भूकंप येण्याची शक्यता राहते.
2. जर बैल रात्री विनाकारण ओरडत असेल तर हासुद्धा भूकंप येण्याचा संकेत समजावा. असे घडल्यास निकट भविष्यात भूकंप येण्याची शक्यता राहते.
3. जर एखादी गाय दुःखी दिसत असेल तर तो त्या देशाच्या राजासाठी अशुभ संकेत समजावा. वर्तमान काळात राजाचा अर्थ प्रशासन समजावा.
4. जर एखादी गाय घाबरून मोठमोठ्याने ओरडत असेल तर हा चोरी होण्याचा संकेत समजावा
5. गाय विनाकारण मोठमोठ्याने ओरडत असेल तर हा एखादा अनर्थ घडण्याचा संकेत आहे. हा मोठ्या संकटाचा संकेत असू शकतो.

पुढे जाणून घ्या, निसर्गाशी संबंधित काही खास संकेत...