आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना घरापासून दूर राहून काम केल्यास मिळतो जास्त पैसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर एखाद्या व्यक्तीची कुंडली सिंह लग्नाची असेल आणि कुंडलीत प्रथम आणि द्वितीय स्थानात चंद्र असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर चंद्राचा प्रभाव कसा राहतो...

सिंह लग्न कुंडलीत प्रथम स्थानात चंद्र असेल तर....
जर एखाद्या व्यक्तीची कुंडली सिंह लग्नाची असेल आणि लग्न स्थानात चंद्र असेल तर त्या व्यक्तीला शारीरिक दुर्बलतेचा सामना करावा लागतो. कुंडलीतील प्रथम स्थान शरीर कारक स्थान आहे. प्रथम स्थानात सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्याच्या या राशीत चंद्र असल्यामुळे व्यक्तीला घरापासून दूर राहून काम केल्यास जास्त लाभ प्राप्त होतो. घरापासून दूर राहिल्यास यांचे मजबूत व्यापारिक संबंध निर्माण होतात. यांचा खर्च जास्त प्रमाणात असल्यामुळे यांना चिंता आणि आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो
सिंह लग्न कुंडलीत द्वितीय स्थानात चंद्र असेल तर....
कुंडलीतील द्वितीय स्थान धन कारक स्थान आहे. सिंह लग्न कुंडलीत द्वितीय स्थान कन्या राशीचे असून स्वामी बुध आहे. बुध ग्रहाच्या या राशीत चंद्र असल्यास व्यक्तीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. पराक्रमाच्या क्षेत्रामध्ये कमकुवतपणा राहतो. या लोकना घरापासून दूर राहिल्यास जास्त धन लाभ होण्याची शक्यता राहते.