आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effects Of Mangal On All Zodiac Sign 25 27 August

79 वर्षांनंतर सर्वात जास्त चमकणार मंगळ, जाणून घ्या तुमच्या राशीवरील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाल ग्रह मंगळ 79 वर्षांनंतर सर्वात जास्त चमकदार दिसणार आहे. 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान ही अद्भुत खगोलीय घटना घडणार आहे. टेलिस्कोपच्या माध्यमातून सामान्य लोकही ही घटना पाहू शकतील. मंगळ पृथ्वीच्या खूप जवळ राहील आणि यावर शनीची दृष्टी असल्यामुळे हा सर्वात चमकदार दिसेल. यापूर्वी 1935 मध्ये अशी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

जिवाजी वेधशाळा उज्जैनचे अधिकारी डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्त यांनी सांगितले की, या काळात चमकणारा तारा 'स्पाइक'सुद्धा मंगळ ग्रहाजवळ असल्यामुळे या ग्रहाची चमक आणखी वाढणार आहे. उज्जैनचे पंचांगकर्ता व ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक 26 महिन्यानंतर मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येतो परंतु या वर्षी 30 वर्षांनंतर शनीची मंगळ ग्रहासोबतची युती खास संयोग जुळवून आणत आहे. शनीची निळी आणि मंगळाची लाल आभा सूर्यास्तानंतर आकशात विलोभनीय दृश्य निर्माण करेल.

पं. व्यास यांच्यानुसार 79 वर्षांनंतर मंगळ सर्वात जास्त चमकदार दिसेल. मंगळ आणि शनि एक रेषेत असल्यामुळे ही स्थिती निर्माण होईल. यापूर्वी मंगळ आणि शनि युतीचा योग तूळ राशीमध्ये 3 मे 1984 मध्ये जुळून आला होता आणि पुढे ऑक्टोबर 2042 मध्ये जुळून येईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार 25-26 ऑगस्टला शनि आणि मंगळ समान अंशात राहतील. या दिवशी अमावस्या असल्यामुळे हे ग्रह प्रभावशाली राहतील आणि नैसर्गिक नुकसान करतील.
पुढे जाणून घ्या, मंगळ ग्रहाचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)