आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • February Third Week Horoscope In Marathi Venus Transit

16 ते 22 फेब्रुवारीपर्यंतचे राशिभविष्य : उच्च राशीत राहील शुक्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्याची सुरुवात शुभ ग्रहस्थितीने होत आहे. 16 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजल्यापासून शुक्र आपल्या उच्च म्हणजे मीन राशीत प्रवेश करेल. उच्च राशीचा शुक्र धनलाभ आणि सुख देईल. शुक्र ग्रह भोग, विलास, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य कारक ग्रह आहे. 25 दिवस शुक्र उच्च राशीत राहील. हा ग्रह 12 मार्चला मेष राशीत प्रवेश करेल.

या आठवड्यात चंद्र धनु राशीपासून मीन राशीपर्यंत जाईल. सूर्य, बुध, मंगळ, शुक्र आणि केतुसोबत हा राहील. या ग्रहांसोबत चंद्र असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शुभ-अशुभ योग जुळून येतील. पुढे जाणून घ्या, हे सात दिवस तुमच्या राशीसाठी कसे राहतील. कोणाला काय मिळणार, कोणासोबत काय घडणार....

मेष - या आठवड्यात तुम्ही असे एखादे काम कराल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. या आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. संवादामध्ये, विचारांमध्ये आणि संपर्कामध्ये वृद्धी होईल. तुमची नवीन लोकांशी ओळख होईल तसेच नवीन ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचे योग जुळून येतील. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात इतरांसाठी सहायक ठराल. या आठवड्यातील मध्यकाळ तसेच शेवट तुमच्यासाठी उत्तम राहील.

लव्ह - या आठवड्यात जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या, फायदा होईल.

प्रोफेशन - कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या. कामामध्ये मन लागत नसेल तर ते उद्यावर ढकला.

हेल्थ - या राशीच्या लोकांना दुषित पाण्यामुळे आजार होण्याची शक्यता आहे.

करिअर - या राशीच्या विद्यार्थ्यानी आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि यशासाठी शॉर्टकट घेऊ नका.

इतर राशींचे संपूर्ण राशिभविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...