9 डिसेंबरपासून गुरूने
आपली चाल बदलली आहे. वक्री गुरूचा शुभ-अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. गुरूचा अशुभ प्रभाव मेष, मिथुन, कर्क, कन्या, तूळ आणि मीन राशीवर राहील. या कारणांमुळे या राशीच्या लोकांना धनहानी, चिंता, थकवा आणि विविध समस्यांना सामोरे जावे लागते. गुरूच्या अशुभ प्रभावासोबतच प्रत्येक दिवसाच्या ग्रह स्थितीचा प्रभावही सर्व लोकांवर राहील. आज मघा नक्षत्रामधील चंद्र 'काण' नावाचा अशुभ योग तयार करत आहे. हा अशुभ योग सिंह राशीत तयार होत आहे. या राशीवर गुरूचा अशुभ प्रभाव नसला तरी या राशीच्या लोकांनी आज सावध राहणे आवश्यक आहे.
आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वैधृती नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने आज कामामध्ये मन लागणार नाही, कष्टाचे पूर्ण फळ न मिळाल्यामुळे चिडचिड होऊ शकते.
आजची ग्रह स्थिती -
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्रमा - सिंह सिंह राशीमध्ये
मंगळ - मकर राशीमध्ये
बुध - वृश्चिक राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - धनु राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या दोन अशुभ योगांचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील...
(फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)