आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधन 10 ऑगस्टला, राखी बांधण्यासाठी कोणती आहे मंगळ वेळ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावण महिन्यात नागपंचमी झाल्यानंतर सणवारांची चाहूल लागते. आता र्शावणातील दुसर्‍या रविवारी येणार्‍या राखीपौणिर्मेची तयारी सुरू झाली आहे. बाजारही वेगवेगळ्या आकर्षक राख्यांनी सजण्यास सुरुवात झाली आहे. यादिवशी भद्रा येत असल्याने भद्रा संपल्यानंतर रक्षाबंधन साजरे करण्यात येणार आहे.राखी बांधण्यासाठी उत्तम वेळ दुपारी 1.37 पासून ते रात्री 10.39 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनासाठी केवळ नऊ तास दोन मिनिटे एवढाच मंगल मुहूर्त असेल. 10 ऑगस्टच्या सकाळी 6.05 वाजता सूर्योदयापासून रात्री 11.38 वाजेपर्यंत पौर्णिमा, तर सूर्योदयापासून रात्री 10.39 वाजेपर्यंत र्शवण नक्षत्रही असेल, या वेळात राखी बांधता येऊ शकते. मात्र, 9 ऑगस्टच्या पहाटे 3.35 वाजेपासून ते 10 ऑगस्टला दुपारी 1.37 वाजेपर्यंत भद्रा काळ आहे. शास्त्रानुसार भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य वज्र्य असते. त्यामुळे या काळात रक्षाबंधन करता येणार नाही. 10 ऑगस्टला दुपारनंतरच रक्षाबंधनाचा उत्तम काळ राहणार आहे, असे जाणकारांचे मत आहे.राखी पौर्णिमेला दुपारी 1 वाजून 36 मिनिटापर्यंत भद्रा आहे. त्यामुळे रक्षाबंधन केव्हा करावे, याविषयी संभ्रम आहे. काहींच्या मते भद्रा असताना राखी बांधायला हरकत नाही तर काहीजण भद्रा काळाला अशुभ मानतात. गौरी पूजनही भद्रा काळात आले तर तो काळ टाळूनच पूजा केली जाते, असे जाणकारांचे मत आहे.राजंदेकरांच्या महाराष्ट्रीय पंचांगानुसार, दुपारी 1.36 वाजेपर्यंत भद्रा असल्याचे नमूद आहे. त्याच पंचांगात सकाळी 8.35 ते 11.05 भद्रपुच्छाचा काळ असून या दरम्यान रक्षाबंधन करावे, असे जाणकारांनी सुचवले

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, भद्रा मध्ये का करुनये शुभकार्य