ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या जन्म कुंडलीत बृहस्पती ग्रहा (गुरु)ची स्थिती अशुभ असेल, त्यांना जीवनात विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. या दोषाचा व्यक्तीच्या अभ्यास, नोकरी, दाम्पत्य जीवनावर तसेच आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. काही सोपे आणि प्रभावी उपाय करून या दोषांच्या वाईट प्रभावाला कमी केले जाऊ शकते. हे उपाय गुरुपौर्णिमेच्या (31 जुलै, शुक्रवार) शुभ योगात केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. येथे जाणून घ्या, गुरु ग्रहाला प्रसन्न करण्याचे खास उपाय...
1- औषध स्नान :
गुरु ग्रहाने पिडीत असलेल्या व्यक्तीने हळद, साखर, मीठ, मध, उंबर, पिवळ्या फुलांनी युक्त पाण्याने स्नान करावे. हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा एखाद्या गुरुवारी सुरु करून दररोज करावा.
2. पुष्कराज दान -
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु अशुभ स्थानामध्ये असेल, त्या व्यक्तीने या दोषाच्या शांतीसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य ब्राह्मणाला हळद, पिवळे कपडे, तूप, हरभर्याची डाळ, पिवळे फळ, फुल, सोने, बृहस्पती यंत्र इ. वस्तूंसोबतच पुष्कराज रत्न दान करावे.
गुरु दोषाचे प्रभाव कमी करण्याचे इतर खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...