या महिन्यात २२ जुलै, सोमवारी गुरुपौर्णिमा आहे. गुरूमुळे
आपल्या जीवनाला आकार येतो, अर्थ प्राप्त होतो तो गुरूजनांमुळेच भारत हा उज्ज्वल प्राचीन संस्कृती असलेला देश आहे. ऋषीमुनींच्या या देशात नीतीला खूपच महत्त्व आहे. नीतीचे नियम, सिद्धांत याची जाणीव आपल्या पूर्वीच्या काळी गुरूंनीच करून दिली आहे. लहानपणी आपल्यावर संस्कार करणार्या मातेपासून ते मोठेपणी आध्यात्मिक मार्गाची दिशा दाखविणार्या संत माहात्म्यापर्यंत गुरूंची अनेक रूपे आपण अनुभवतो. या गुरूंविषयी कृतज्ञता, भक्ती, आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढातील गुरुपौर्णिमा, या पौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.
शास्त्रानुसार आपली गुरूकडे रिकाम्या हाताने कधीही जाऊ नये. फळ, वस्त्र, अन्न किंवा कोणतीही एखादी भेटवस्तू घेऊन गुरूच्या दर्शनासाठी जावे. आपल्या राशीनुसार जाणून घ्या आपण आपल्या गुरूला कोणती भेट द्यावी. गुरूला राशीनुसार भेट दिल्याने तुम्हाला गुरूचा आशीर्वाद मिळेल, त्याचबरोबर सुख-समृद्धी प्राप्त होईल.